शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘जी-२०’साठी औरंगाबादेत परदेशी पाहुणे येणार; दुरावस्थेने बसस्थानक झाकून ठेवायची वेळ

By संतोष हिरेमठ | Updated: December 6, 2022 13:03 IST

औरंगाबादवर अहमदाबाद सारखीच नामुष्कीची वेळ; जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी असलेल्या शहरातील बसस्थानकांची दुरवस्था

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : अहमदाबादेत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारी २०२० मधील दौऱ्यापूर्वी त्यांना झोपड्या दिसू नयेत, म्हणून एक खास भिंत उभारण्यात आली होती. फेब्रुवारीत होणाऱ्या जी-२० परिषदेनिमित्त अनेक देशांचे प्रतिनिधी औरंगाबादेत येणार आहेत. त्यांच्यासमोर शहराची नाचक्की होऊ नये, यासाठी अहमदाबादप्रमाणे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक झाकून ठेवायची वेळ येणार का, असाच प्रश्न आहे. कारण पर्यटन, उद्योगनगरीतील बसस्थानकांच्या दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याची चित्र आहे.

भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-२० परिषदेचे आयोजन करणार आहेत. त्याअंतर्गत १३ व १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे ‘महिला व बाल विकास’ या विषयावर परिषद होणार आहे. त्यासाठी अनेक देशांतील प्रतिनिधी येणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक, तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरूळ, अजिंठा येथील सोयी-सुविधा, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणीपुरवठा आदी व्यवस्थांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येणाऱ्या पाहुण्यांना सर्व सोयी-सुविधा देण्यात कोणतीही कमतरता भासणार नाही, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत; परंतु शहरातील बसस्थानकांच्या दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. शहरातील बसस्थानकांची दुरवस्था दोन महिन्यांत दूर होणार नाही. त्यामुळे परदेशी पाहुण्यांनी जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी असलेल्या शहरातील वाहतूक व्यवस्था पाहण्याचा विचार केला तर काय दाखविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे स्थिती?मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. आजघडीला बसस्थानकातील प्लास्टर निखळल्याने जागोजागी छतातील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. इमारतीवर जागोजागी झाडी वाढली आहे. संपूर्ण आगार खडीमय, खड्डेमय झाले आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडते. सिडको बसस्थानकाच्या जागी होणाऱ्या बसपोर्टसह मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले; परंतु त्यानंतर ३ वर्षे होऊनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. सिडको बसस्थानकाच्या जागी विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक उभारण्याचे नियोजन कागदावरच आहे.

परवानगी मिळताच फेरनिविदासिडकोकडून लवकरच ‘एनओसी’ मिळणार आहे. त्यामुळे बसपोर्टचे काम लवकरच सुरू होईल. मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामासाठी डेव्हलपमेंट चार्ज न घेता परवानगी देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ही परवानगी मिळताच फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाईल.- गणेश राजगिरे, कार्यकारी अभियंता, एसटी महामंडळ.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद