शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सुदृढ आरोग्यासाठी क्षमता ओळखूनच करा व्यायाम, अति व्यायामाचे धोके काय?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 29, 2024 17:45 IST

कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे वाईट परिणामही जाणवतात. अति व्यायाम करणेही धोकादायक ठरू शकते.

छत्रपती संभाजीनगर : निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनानंतरच्या काळात तर जीममध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कारण, सर्वजण आरोग्याच्या प्रति जागरूक झाले आहेत. पण, व्यायाम करताना अति उतावळेपणा टाळा. कारण, ‘अति तिथे माती’ असे म्हटले जाते. कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे वाईट परिणामही जाणवतात. अति व्यायाम करणेही धोकादायक ठरू शकते.

व्यायाम करण्याआधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यकव्यायाम सुरू करण्याआधी फिटनेस ट्रेनर किंवा तज्ज्ञांशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्या चर्चेतून ‘वर्कआऊट प्लॅन’ तयार केला जातो. त्यानुसारच स्टेप बाय स्टेप व्यायाम केला तरच त्याचा शरीराला फायदा होऊ शकतो. लवकरात लवकर सुदृढ शरीर करण्याच्या नादात दुसरी स्टेप सोडून थेट सहावी स्टेप करण्यास सुरुवात कराल तर ते घातक ठरू शकते. अशी अनेक उदाहरणे जीममध्ये पाहण्यास मिळतात.

व्यायाम शरीरासाठी फायदेशीरदररोज व्यायाम केल्याने शरीराचे संतुलन टिकून राहते. दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम फायदेशीर होतो. चालणे हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे. व्यायाम केल्याने शरीरातील घाम निघून जातो. व्यक्ती ताजी-तवानी होते. पहाटे किंवा सकाळच्या वेळी व्यायाम करणे सर्वाेत्तम मानले जाते.

अति व्यायामाचे धोके काय ?१) स्नायूंमध्ये वेदना होणे : व्यायाम केल्यानंतर शरीरातील स्नायू दुखू लागतात. विशेषत: पहिल्यांदा व्यायाम करीत असलेल्यांना असा त्रास जास्त जाणवतो. तसेच अति व्यायाम केल्यानेही स्नायूंमध्ये वेदना होतात.२) दमल्या-थकल्यासारखे वाटणे : जास्त व्यायाम केल्यावर दमल्या-थकल्यासारखे, गळून गेल्यासारखी अवस्था होणे.३) निद्रानाशाची समस्या : तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम केल्यास शरीराला आराम मिळतो तसेच रात्री झोपही चांगली येते. पण, अति व्यायाम केल्याने स्नायू दुखू लागतात व त्यामुळे झोपही येत नाही.

क्षमता ओळखून व्यायाम करातुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा शरीराची हालचाल वेगाने होते. जर अति व्यायाम केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. जास्त ऊर्जा संपते व नंतर थकवा जाणवू लागतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अनेकदा गंभीर आजार उद्भवू शकतात.- फिटनेस ट्रेनर

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य