शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देव, देश, धर्मासाठी आमचे सरकार, संकटांतून आप्पासाहेबांच्या आशीर्वादामुळे बाहेर पडलो: CM शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 05:48 IST

देव, देश आणि धर्म ही त्रिसूत्री पाळण्याचे काम आमचे सरकार करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क  

औरंगाबाद : देव, देश आणि धर्म ही त्रिसूत्री पाळण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांची ही त्रिसूत्री असून, आमचे सरकारदेखील या त्रिसूत्रीप्रमाणेच काम करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. डॉ. नानासाहेब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वच्छता अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.       मीदेखील धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या कुटुंबावर जेव्हा मोठी संकटं आली, त्यावेळी सगळं संपलं असं वाटलं; पण माझ्या पत्नीने प्रतिष्ठानच्या बैठकीचा मार्ग निवडला आणि आप्पासाहेबांच्या आशीर्वादाने सगळं निभावलं, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

छावणी परिषदेच्या मैदानावर शिस्तीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, राहुल धर्माधिकारी, रमेश पवार आदींची उपस्थिती होती. 

अंधश्रद्धेला थारा नकाे  

अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकाने पर्यावरण, आरोग्यासाठी काम करावे. मनातला अहंकार कमी झाला तरच माणूस कचऱ्यात हात घालतो. स्वच्छता ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. - डाॅ. सचिन धर्माधिकारी 

स्वच्छता महत्त्वाची 

जी-२०च्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात परदेशी पाहुणे शहरात येणार आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे मी डॉक्टर असल्याने जाणतो. - डॉ. भागवत कराड

विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे 

विधानसभेचे अधिवेशन नागपुरात होत आहे, विदर्भाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर, मराठवाड्याच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. मात्र, विरोधक गोंधळ करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. बिल्डरच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली आहे. त्याबाबत माझ्यावर आरोप करणे केविलवाणा प्रयत्न असल्याचे शिंदे म्हणाले. एनआयटी जमीन प्रकरणी विरोधक तोंडघशी पडल्याचा दावा त्यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे