शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अन्न शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या परिषदेची जोरदार तयारी

By admin | Updated: December 16, 2015 23:33 IST

परभणी : येथील कृषी विद्यापीठामध्ये १८ व १९ डिसेंबर रोजी अखिल भारतीय स्तरावरील अन्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची १४ वी परिषद होत आहे़

परभणी : येथील कृषी विद्यापीठामध्ये १८ व १९ डिसेंबर रोजी अखिल भारतीय स्तरावरील अन्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची १४ वी परिषद होत आहे़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्न तंत्र महाविद्यालय आणि म्हैसूर येथील अ़भा़ अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळाच्या वतीने ही परिषद घेतली जात आहे़ कृषी प्रक्रिया व शाश्वत तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण या विषयावर आधारित ही परिषद आहे़ म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था आणि डिफेन्स फूड रिसर्च लायब्रोटरी हे परिषदेचे सहसंयोजक आहेत़ कृषी उत्पादित माल नाशवंत व हंगामी स्वरुपाचा असल्याने त्याची उपलब्धता विशिष्ट काळात होत असते़ काढणी तंत्रज्ञानाचा अभाव, प्रक्रिया व साठवणुकीच्या अपुऱ्या सोयीमुळे उत्पादीत कृषी मालाचे मोठे आर्थिक नुकसान होते़ हे दृष्ट चक्र थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनीच आपल्या उत्पादीत मालावर प्रक्रिया करून त्यापासून मूल्यवर्धित व प्रक्रिया युक्त अन्नपदार्थाची निर्मिती केली तर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो़ मराठवाड्यात शेतीला पुरक जोड धंद्याशिवाय गत्यंतर नसून अन्न प्रक्रिया उद्योगाची कास शेतकऱ्यांना धरावी लागणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता विकसित होण्यास चालना मिळावी, या मूळ उद्देशातूनच अन्न प्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे आयोजन केले आहे़ यामुळे अन्नप्रक्रियाबाबतचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ओळखता येणार आहे़ या प्रदर्शनित अन्नप्रक्रिया, काढणी पश्चात तंत्रज्ञान, विपणन व्यवस्था यावर भर राहणार आहे, असे कृषी विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)