शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांविरुद्ध कार्यवाही करून खंडपीठात अहवाल सादर करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:59 IST

स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांना संरक्षण देणारा माजी मुख्यमंत्र्यांनी कक्ष अधिकाऱ्यांमार्फत दिलेला ३ सप्टेंबर २०१४ चा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी सोमवारी (दि.२५) रद्द केला. आदेश निघाल्यापासून (दि. २५ फेब्रुवारी २०१९) एक महिन्यात संबंधित बोगस पाल्यांविरुद्ध पुढील योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने औरंगाबाद आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देखंडपीठ: बोगस पाल्यांना संरक्षण देणारा माजी मुख्यमंत्र्यांच्या कक्ष अधिकाऱ्यांमार्फत दिलेला आदेश रद्द

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांना संरक्षण देणारा माजी मुख्यमंत्र्यांनी कक्ष अधिकाऱ्यांमार्फत दिलेला ३ सप्टेंबर २०१४ चा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी सोमवारी (दि.२५) रद्द केला.आदेश निघाल्यापासून (दि. २५ फेब्रुवारी २०१९) एक महिन्यात संबंधित बोगस पाल्यांविरुद्ध पुढील योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने औरंगाबाद आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ५७० बोगस पाल्यांची चौकशी चालू आहे. त्यांच्यापैकी ४८ जणांना चौकशी समितीने दोषी धरले आहे.स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असल्याच्या प्रमाणपत्राआधारे शासकीय नोकरी मिळविलेल्या बोगस पाल्यांविरुद्ध पांडुरंग मोने यांनी जनहित याचिका दाखल केली होती. खंडपीठाने औरंगाबाद आणि जालन्याच्या जिल्हाधिकाºयांना संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले होते.याचिकेतील आदेशाप्रमाणे १४ जून २०१४ रोजी स्थापन केलेल्या सहा प्रशासकीय अधिकाºयांच्या चौकशी समितीने ४८ स्वातंत्र्यसैनिकांच्या बोगस पाल्यांचे नामनिर्देशनपत्र रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालन्याच्या जिल्हाधिकाºयांनी संबंधित पाल्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही सुरूकेली असता संबंधित बोगस पाल्यांनी खंडपीठात दिवाणी याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाने सुरुवातीस त्यांना तात्पुरते संरक्षण दिले. मात्र, कायमस्वरूपी संरक्षण देण्यास नकार दिला.त्यामुळे संबंधित पाल्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांनी ३ सप्टेंबर २०१४ रोजी कक्ष अधिकाºयांमार्फत तात्काळ आदेश पारित करून औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, पुणे, बुलडाणा, नाशिक आणि परभणीच्या जिल्हाधिकाºयांना स्वातंत्र्यसैनिकांच्या वरील पाल्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास मनाई केली होती.३ सप्टेंबर २०१४ चा हा आदेश रद्द करावा आणि बोगस पाल्यांना बडतर्फ करावे, अशी विनंती करणारी याचिका मोने यांनी अ‍ॅड. अंगद कानडे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली होती.आज याचिकेच्या अंतिम सुनावणीवेळी अ‍ॅड. कानडे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदरील बोगस नोकरदार पाल्यांचे नामनिर्देशनपत्र खंडपीठाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले आहे. चौकशीअंती ते सर्व बोगस पाल्य असल्याचे आढळले आहे. त्यांना बडतर्फ करणे योग्य आहे. संबंधितांविरुद्ध बडतर्फीची कार्यवाही सुरूअसताना मंत्री आदेश पारित करून त्यांना संरक्षण देऊ शकत नाहीत. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालयMarathwadaमराठवाडा