शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

धार्मिक, सामाजिक देखाव्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:54 IST

अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे उभारण्याची जय्यत तयारी सुरू असून, विशेषत: जुन्या शहरातील काही गणेश मंडळे यंदाही धार्मिक व सामाजिक विषयावरील देखावे उभारत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे उभारण्याची जय्यत तयारी सुरू असून, विशेषत: जुन्या शहरातील काही गणेश मंडळे यंदाही धार्मिक व सामाजिक विषयावरील देखावे उभारत आहेत.शहागंज, गांधी पुतळा परिसरातील नवसार्वजनिक गणेश मंडळ यंदा ५० फूट उंचीची अक्षरधामची प्रतिकृती उभारत आहे. या मंडळाचे यंदा ३८ वे वर्ष आहे, तसेच गणेशोत्सवात जम्मू-काश्मीरच्या नृत्य कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने शहागंज चमन चौकात संत तुकाराम महाराजांवर आधारित देखावा साकारणार आहे. जाधवमंडी येथील यादगार गणेश मंडळाने यंदा जागरण गोंधळाचा देखावा उभारला आहे. ४० बाय ५० फुटांच्या भव्य स्टेजवर हा देखावा उभारला जात आहे.३० वर्षांपूर्वी चलदेखाव्याची सुरुवात या मंडळाने जागरण गोंधळापासून केली होती. यंदा मछलीखडक येथील संगम गणेश मंडळ म्युझिक लायटिंग तयार करीत आहे. याशिवाय चिकलठाण्यातील सावता गणेश मंडळ यंदा तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारत आहे. छावणीतील गणेश मंडळ देखावा तयार करीत आहेत. देखावे तयार करणारे शहरात ठराविक गणेश मंडळे राहिली आहेत.गणेशभक्तांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठ बहरलीलाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त त्याच्या स्वागताकरिता सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मंगळवारी बाजारपेठेत गर्दी झाली होती.गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या पसंतीनुसार सजावटीचे साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे. विशेषत: गुलमंडी, मछलीखडक, सुपारी हनुमान रोड, पानदरिबा रोड, सिटीचौक, कुंभारवाडा, औरंगपुरा या परिसरात गर्दी दिसून आली. अनेक जण सहपरिवार खरेदीसाठी येत होते. याशिवाय सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोड, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर रोड, शिवाजीनगर, आविष्कार कॉलनी रोड, टीव्ही सेंटर परिसर या भागातही सजावटीचे साहित्य व श्रींची मूर्ती खरेदी करताना गणेशभक्त दिसून आले. गणरायापाठोपाठ आता महालक्ष्मीचे आगमन होत आहे. महालक्ष्मीचे मुखवटे, रेडिमेड साड्या, पत्र्याच्या कोठ्या खरेदीसाठी महिला वर्गही बाहेर पडल्याचे दिसून आले.सुमारे ४ लाख मूर्ती शहरातबाजारपेठेत स्थानिक, तसेच पेण, नगर, चिखली, अमरावती, अकोला शहरातून बाजारपेठेत लहान-मोठ्या ४ लाख मूर्ती दाखल झाल्या आहेत. औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर मूर्ती विक्रीचे ६० स्टॉल, सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवर ८५ स्टॉल, टीव्ही सेंटर परिसरात ३० स्टॉलमध्ये लहान-मोठ्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक भागांतील मुख्य रस्त्यांवरील छोट्या स्टॉलवर, हातगाड्यांवर ५० पेक्षा अधिक विक्रेते आहेत.यंदा ५ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीचे प्रमाण कमी आहे. १ ते ३ फुटांपर्यंतच्या मध्यम आकारातील मूर्ती अधिक असल्याची माहिती ठोक विक्रेते अशोक राठोड यांनी दिली.कृत्रिम फुलांचा बहरशहरातील फूल विक्रेत्यांनी कृत्रिम फुलांचा वापर करून आर्कषक कमानी तयार केल्या आहेत. प्रत्येक फूल विक्रेत्याच्या स्टॉलवर लहान-मोठ्या असंख्य कमानी आहेत. यात भारतीय व चायना बनावटीची कृत्रिम फुले आहेत. त्यात जास्वंद, गुलाब, मोगरा, सूर्यफूल,जाई-जुईच्या फुलांनी सजावट के ली आहे. असली कोणते व नकली कोणते, असा संभ्रम पडावा, अशी फुले बघण्यास मिळत आहेत. २०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांदरम्यान फुलांची सजावट विकली जात आहे.मूर्तिकारांकडील लहान व मध्यम आकाराच्या मूर्ती किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केल्या. आता मूर्तिकारांनी मोठ्या आकारातील श्रींच्या मूर्तीच्या रंगरंगोटीकडे लक्ष दिले आहे. यंदा अत्यंत कमी गणेश मंडळांनी १० ते १५ फूट उंचीच्या मूर्ती बनवून घेतल्या आहेत. मूर्तीही रंगरंगोटीसाठी मूर्तिकारांकडे आल्या आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Marketबाजार