बाजारसावंगी : येसगांव नंबर एक येथील गिरिजा मध्यम प्रकल्पाच्या पाळुवर पाण्याच्या बाजुनेच मोठ्या प्रमाणावर नंदनवन फुलल्याने प्रकल्पास धोका निर्माण झाला आहे. या गंर्भीर बाबींकडे शाखा अभियत्यांचे दुर्लक्ष होत असल्याने झाडाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खुलताबाद आणि फुलंब्री शहरासह परिसरातील नागरिकांची तहान भागविणारा हा प्रकल्प यंदा ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहात आहे.
यंदा दमदार पाऊस झाल्याने खुलताबाद तालुक्यातील सर्वच प्रकल्पातील पाणी साठ्यात मुबलक प्रमाणात वाढ झाली. यात गिरीजा मध्यम प्रकल्प सुद्धा अनेक वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाला होता. मुबलक पाणीसाठी उपलब्ध झाल्याने झाल्याने या प्रकल्पाची देखरेख तसेच तपासणी होणे गरजेचे बनले आहे. या मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या बाजुने दगडी भितींत लहान मोठी झाडे उगवली असून काही झाडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. प्रत्येक वर्षी ही झाडे, झुडपांची सफाई करणे गरजेचे असून शाखाअभियंता तसेच इतर कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
हि झाडे मोठ्या प्रमाणावर वाढली गेली आहे
-------
धोक्याचे संकेत
या प्रकल्पाच्या पाळुवर अनेक लहान, मोठी झाडे उगवल्याने प्रकल्पाच्या भितींत या झाडांच्या मुळ्यामुळे धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पात पाणी नसल्याने झाडा, झुडपांची अडचणी नव्हती. मात्र यंदा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने झुडपांमुळे संभाव्य धोक्याची शक्यता वाढली आहे. मात्र याकडे जबाबदारी अधिकारी, कर्मचारी सर्रास दुर्लक्ष करत आहे.
-------
कुलुपबंद कार्यालय
गिरिजा मध्यम प्रकल्पाच्या अडचणीबाबत येसगाव येथील शाखा अभियंता कार्यालयास भेट दिली आसता ते कार्यालय कूलुपबंद असल्याचे आढळुन आले. संबंधित कार्यालय नियमित उघडत नसल्याचे परीसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळ मिळेल तेव्हा ते या कार्यालयात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
---- कॅप्शन : येसगावच्या गिरिजा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य पाळुवर वाढलेली झाडे.
--- शाखा अधिकाऱ्यांचे कुलुपबंद असलेले कार्यालय.