शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करून मालकाचीच बुलेट घेऊन फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:41 IST

बुलेट, ५ मोबाईल व रोख १० हजार रूपये असा जवळपास ९५ हजारांचा ऐवज लांबवून वेटरनेच हॉटेल  चालकाला गंडा घालण्याची  घटना  एमआयडीसी वाळूज महानगर येथे शुक्रवारी उघडकीस आली. 

वाळूज महानगर : बुलेट, ५ मोबाईल व रोख १० हजार रूपये असा जवळपास ९५ हजारांचा ऐवज लांबवून वेटरनेच हॉटेल  चालकाला गंडा घालण्याची  घटना  एमआयडीसी वाळूज महानगर येथे शुक्रवारी उघडकीस आली. वेटरविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल आंबादास कदम (रा. बजाजनगर) याचे पंढरपूरातील धरम काट्याजवळ सारा वैभव बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये  कदम यांनी दि.१ ऑक्टोबर रोजी वैभव दिलीप बागुल (२२ रा. दादर, मुंबई) यास वेटर म्हणून कामावर घेतले. कदम यांनी सर्व वेटर्सची राहण्याची  व्यवस्था हॉटेलमध्येच केलेली होती.

बुधवारी (दि. ७) रात्री  हॉटेल बंद करुन व्यवस्थापक एकनाथ पवार घरी गेले तर कदम यांचा पुतण्या वैभव कदम हा हॉटेलमध्येच मुक्कामाला थांबला.  सकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास हॉटेलमधील वेटर अक्षय परागणे हा लघुशंकेसाठी उठला असता त्यास हॉटेलच्या किचनचा दरवाजा उघडा दिसला. रुममधील कुणीतरी वेटर बाहेर गेला असेल, असे समजुन अक्षय याने हॉटेलच्या बाहेर येऊन पाहणी केली असता त्यास हॉटेल मालक कदम यांची बुलेट दिसली नाही. यानंतर अक्षयने वेटर झोपलेल्या रुममध्ये जाऊन पाहिले असता चौघांचेही मोबाईल दिसले नाही. तसेच वैभव बागुल हा देखील गायब असल्याचे दिसले. यानंतर वैभव कदम याने हॉटेलचे काऊंटर तपासले असता हॉटेलमधील एक मोबाईल, रोख १० हजार रुपये, दोन एटीम कार्ड, पॅन व आधारकार्डही गायब असल्याचे दिसले.

यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता पहाटे ३ ते ४.१५ च्या सुमारास बागुल हा काऊंटरमधुन साहित्य बाहेर  काढतांना  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे निदर्शनास आले. चोरी करून तो हॉटेल मालक कदम यांची बुलेट (क्रमांक एम.एच.२०, डी.ए.०३०१) घेऊन फरार  झाला. याप्रकरणी हॉटेल मालक कदम यांच्या तक्रारीनुसार फरार वेटरच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे पुढील तपास करत आहेत.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीhotelहॉटेल