शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

Flash Back : इंदिरा लाटेने विरोधक चारीमुंड्या चीत; औरंगाबादकरांचे पालोदकरांना छप्पर फाडके मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:50 IST

लोकसभेची पाचच्या निवडणूकीत गरिबी हटावची घोषणा 

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : चौथ्या लोकसभेत दोलायमान झालेल्या काँग्रेस पक्षाने पाचव्या निवडणुकीत ताकदीने पुनरागमन केले. इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’या लोकप्रिय घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकदादा पालोदकर यांना १ लाख ९४ हजार ९२६ एवढे छप्पर फाडके मतदान केले. भारतीय जनसंघाचे रामभाऊ एकनाथ गावंडे यांच्यासह मिळून सर्व ५ उमेदवारांना ७२ हजार ३१४ मते पडली व ४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

१९६९ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी व पक्षश्रेष्ठी मोरारजी देसाई यांच्यात श्रेष्ठत्वावरून जुंपली व त्याचे पर्यवसान मोरारजींनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाच काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात झाले. काँग्रेसचे दोन गट प्रतिस्पर्धी होऊन १९७१ च्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील गटाने जनसंघासह अन्य विरोधी पक्षांना सोबत घेतले होते. औरंगाबादेत जनसंघाने रामभाऊ एकनाथ गावंडे यांना उमेदवारी दिली होती. ६ रिंगणात; चौघांचे डिपॉझिट जप्त

५ लाख ३० हजार ९२६ एकूण मतदारसंख्या असलेल्या लोकसभा मतदारसंघातून १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील चौघांनी परत घेतले. त्यामुळे माणिकराव पालोदकर (काँग्रेस आय), रामभाऊ गावंडे (भारतीय जनसंघ), बाळासाहेब  शिवराम मोरे (रिपब्लिकन पार्टी - खोब्रागडे गट), मोहंमद जफर खान बाहाबर खान, कान्हीराम रुदयलाल बठोड आणि सय्यद कासीम सय्यद सजन हे तिघे अपक्ष रिंगणात होते. च्२ लाख ७९ हजार ३९० एवढे (५२.६२ टक्के) मतदान झाले. त्यातील पालोदकर यांनी १ लाख ९४ हजार ९२६ (७२.९४ टक्के) मतदान प्राप्त केले. गावंडे यांना ४७ हजार १५ (१७.५९ टक्के), मोरे -११ हजार ३९८ (४.२७ टक्के), खान -१० हजार ६३८, बठोड- २ हजार १४६ आणि सय्यद कासीम यांना १,११७ एवढे मते पडली. गावंडे वगळता सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 

मराठवाड्यासह महाराष्ट्रात लाटमहाराष्ट्रातील ४५ जागांपैकी ४२ जागा काँग्रेस (आय)ने हस्तगत केल्या होत्या. मराठवाड्यातील सर्व सात जागांचा त्यात समावेश आहे. देशात काँग्रेसने पुन्हा ३५२ जागा पटकावताना ४३.६८ टक्के मतदानही घेतले. 

माणिकराव पालोदकर यांचा अल्प परिचयमाणिकराव सांडू (पाटील) पालोदरकर यांचा जन्म पालोद (ता. सिल्लोड) मध्ये झाला. कृषी व सहकारमध्ये ते अग्रणी होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, तालुका सहकारी देखरेख संघाचे संचालक, जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेचे संचालक, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सिल्लोडचे चेअरमन, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे त्यांनी भूषविली. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दीर्घकाळ वावर व छाप होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादcongressकाँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019