शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

विचित्र अपघातात पाच प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:52 PM

सिग्नलवर थांबलेल्या कारला शिवशाही बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कार समोरून येणाऱ्या दुसºया कारवर आदळली. या विचित्र अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

वाळूज महानगर : सिग्नलवर थांबलेल्या कारला शिवशाही बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कार समोरून येणाऱ्या दुसºया कारवर आदळली. या विचित्र अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीत एका गर्भवती महिलेचा समावेश असून, ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात घडली.

शिवाजी चिकणे शनिवारी सायंकाळी शहरातून नातेवाईकांना घेऊन कारने (एमएच २०, ईवाय- १८४९) सिडको वाळूज महानगरातील घरी येत होते. सिडको वाळूज महानगरातील वाहतूक सिग्नलवर वळण घेण्यासाठी थांबले होते. दरम्यान, साडेसहा वाजेच्या सुमारास पाठीमागून भरधाव औरंगाबाद-पुणे या शिवशाही बसने (एमएच-०४, के- ०७५२) कारला जोराची धडक दिली. या धडकेमुळे उभी असलेली कार पंढरपूरकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाºया अमित शर्मा यांच्या कारवर (जीजे-०६, केडी- ६१९३) आदळली. या अपघातात पूजा नवघरे (२५), गोखरणा नवघरे (६०), बालाजी नवघरे (३०), श्रद्धा चिक णे (१५) व शिवाजी चिकणे हे जखमी झाले. वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूहोती.

परीक्षेसाठी आलेली महिला जखमीया विचित्र अपघातात जखमी झालेली पूजा नवघरे ८ महिन्यांची गर्भवती आहे. औरंगाबाद येथे रविवारी कृषिसेवक पदाची परीक्षा असल्याने त्या परभणी येथून आल्या आहेत. शनिवारी सिडको वाळूज महानगरातील नातेवाईकांच्या घरी कारमधून येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

बसचालकाला पकडलेशिवशाहीच्या बसचालकाने घटनास्थळावरून बस सुसाट वेगाने पळवीत फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पंढरपुरातील तिरंगा चौकात शिवशाही बसचालक शिवनाथ राजेंद्र केदार (रा. शाहूगाव, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.फोटो ओळ - सिडको वाळूज महानगरातील सिग्नलवर झालेल्या विचित्र अपघातात कारची अशी अवस्था झाली. दुसºया छायाचित्रात अपघातास कारणीभूत असलेली शिवशाही बस.

टॅग्स :AccidentअपघातWaluj MIDCवाळूज एमआयडीसी