शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरूचा पाच जणांवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:20 IST

एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने पाच जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री रांजणगाव येथे घडली.

वाळूज महानगर : एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने पाच जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री रांजणगाव येथे घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वैभव बालाजी बिराजदार (रा. शिवशंभू हौ.सो., बजाजनगर), असे हल्ला करणाऱ्या माथेफिरूचे नाव आहे.

वैभव बालाजी बिराजदार या माथेफिरूने रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्यालगत असलेल्या एटीएमजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या अनिल गवारे (२५, रा. कमळापूर फाटा रांजणगाव), नारायण दळवी, शंकर सराजे, शरद दळवी व गजानन कड यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात अनिल गवारे याच्या पोटात, शरद दळवी याच्या दोन्ही हातावर तर गजानन कड याच्या पायावर घाव मारल्याने तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. यातील अनिल गवारे याची प्रकृती चिंताजनक आहे,

तसेच नारायण व शंकर हे दोघेही या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे हल्लेखोर बिराजदार हाही यात जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरील विविध वस्तूंचे नमुने गोळा केले आहेत. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWalujवाळूज