शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवस उलटले; औरंगाबाद महानगरपालिकेला आयुक्त नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:55 IST

दैनंदिन कामकाजावर याचा चांगलाच परिणाम होत आहे.

ठळक मुद्देमागील पाच दिवसांपासून औरंगाबाद महापालिकेला प्रभारी आयुक्तही लाभलेले नाहीत. थेट राज्यपालांनाच आयुक्त द्यावा अशी मागणी करण्यात आली.

औरंगाबाद : मागील पाच दिवसांपासून औरंगाबाद महापालिकेला प्रभारी आयुक्तही लाभलेले नाहीत. दैनंदिन कामकाजावर याचा चांगलाच परिणाम होत आहे. कंटाळलेल्या मनपातील सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी थेट मंत्रालयात नगरविकास विभाग, प्रधान सचिव यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीच सत्ताधाऱ्यांना प्रतिसाद द्यायला तयार नाही. थेट राज्यपालांनाच आयुक्त द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्याचीही दखल घेण्यात आली नाही.

मागील पाच दिवसांपासून औरंगाबाद महापालिका आयुक्ताविना सुरू आहे. नियमित आयुक्त डॉ. निपुण विनायक दीर्घ सुटीवर आहेत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार मंत्रालयाने कोणाकडेही सोपविलेला नाही. त्यामुळे पालिकेचा आयुक्त कोण? असा प्रश्न महापौरांनाही पडला आहे. महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामांच्या संचिका आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू आहे. यातच आयुक्त नसल्याने नगरसेवकांची कोंडी झाली आहे. मनपाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. नवीन नियमित आयुक्त द्यावा, अशी मागणी महापौर घोडेले यांनी चार दिवसांपूर्वीच राज्यपालांकडे केली आहे. शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यामुळेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही   प्रशासकीय कामातून अंग काढून घेतले आहे. 

अनेक कामे ठप्पमनपा निवडणूक तोंडावर आहे, विकासकामे ठप्प आहेत. मनपातील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालेला नाही. दीड महिन्यापासून थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे मनपासमोर साखळी उपोषण सुरू आहे. कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते, अशा गंभीर परिस्थितीत प्रशासन प्रमुख म्हणून प्रत्येक प्रश्नाला तोंड देण्यासाठी आयुक्त नको का? असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला.

प्रभाग रचनेची सर्वांना चिंतावॉर्डातील चार विकास कामे झाली नाहीत तरी चालतील, पण प्रभाग रचना सोयीची झाली पाहिजे असे विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. महापालिकेत आयुक्तच नसल्याने प्रशासनाकडून वॉर्ड रचना अत्यंत नियमांवर बोट ठेवून होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास किमान १० विद्यमान दिग्गज मंडळींना घरी बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोयीची प्रभाग रचना कशी होईल, यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMayorमहापौरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद