राजकुमार जोंधळे ल्ल लातूरझटपट श्रीमंत होण्याच्या लालसेमुळे माणूस कसा गुन्हेगारीच्या विश्वात अडकतो, याचे उदाहरण म्हणून चेन्नईच्या अप्पू स्वामीच्या कारनाम्यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येते. जवळच्या मित्रांचेच अपहरण अप्पूने केले. अप्पू स्वामी हा मुळचा चेन्नईतील रहिवासी. १५ वर्षापूर्वी बांधकाम कारागीर म्हणून लातुरात स्थायिक झाला. अधून-मधून तो आपल्या गावाकडे जात असे. गावाकडच्या मित्रांना भेटत असे. अप्पूलाही पैसा कमवायाचा मोह होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी काय करता येईल, यासाठी तो कट रचत होता. शेवटी विश्वासातील सोहनलालच्या व्यावसायिक अर्थकारणावर त्याची नजर गेली. त्याने सोहनलालचेच अपहरण केले अन् सोहनलालच्या घरच्यांकडून ५० लाखांची खंडणी मागितली. अप्पूने सोहनलालला निलंग्यात बोलावून घेतले. दरम्यान, तिकडून सोहनलाल एकटा निघण्याऐवजी आपला मित्र सिसीकुमार एन गुरुस्वामी याला घेवून लातूरच्या दिशेने निघाला. निलंगा बसस्थानकावरच त्याला उरतण्यास सांगण्यास आले. अप्पूला वाटले सोहनलाल एकटाच आला असेल. त्यासाठी ११ मे रोजी सायंकाळी निलंगा बसस्थानक परिसरात कार घेवून अप्पु स्वामी त्याला घेण्यासाठी थांबला होता. रात्रीच्यावेळी निलंगा येथून सोहनलाल आणि त्याच्या मित्राला घेवून अप्पू निघाला. त्याच्यासोबत इतर सहा जण असल्याचे दिसून आले. त्यावेळी सोहनलाल मात्र घाबरला. काहीतरी काळेबेरे आहे, याचा संशय आला. सोहनलालला वाटले नव्हते. अप्पूहा एवढ्या खालच्या थराला जाईल. मात्र पैशासाठी हा सर्व कट अप्पूने आपल्या साथीदारासोबत रचला होता. दोघांनाही जबर मारहाण करुन या टोळीने त्यांना दिवसा डोळ््यावर पट्टी बांधून गाडीतून फिरवित असे. घरच्यांना बोलत असताना तो साऊंड आॅन करायचा...आणि ५० लाखांची मागणी करायाचा. दरम्यान, त्यांनी अप्पू स्वामीच्या संपर्कातील चेन्नई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या माहितीच्या आधारे त्यांनी अप्पू स्वामीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हे पथक ११ मे पासून त्यांच्या मागावर होते. सोहनलाल व सिसीकुमार यांचे केले होते अपहरणचेन्नईतील ई.सी. आर. रोड कानतपूर येथे राहणाऱ्या सोहनलाल मंगाराम सिरवीचा सोने तारण ठेवण्याचा व्यवसाय आहे. तर सिसीकुमार हा सोहनलालचा मित्र आहे. या दोघांचे अपहरण ११ मे रोजी अप्पू स्वामी व त्याच्या टोळीने केले. सोहनलालच्या पैशावर डोळा ठेवून हे अपहरण करण्यात आले होते. पाचव्या दिवशी अपहरण नाट्याचे बिंग फुटले.अपहरण केल्यानंतर आई-वडील, पत्नी आणि छोट्या मुलांचे चेहरे मला दिसायचे...आपली यातून सुटका नाही, असेच वाटत होते. तो दिवसभर गाडीतच फिरवित होता. या सात जणांपैकी मला केवळ अप्पु स्वामीचीच ओळख होती़ मी रडूनच हे दिवस काढले, असे सोहनलाल म्हणाला.
पाच दिवसानंतर झाली दोघा मित्रांची सुटका
By admin | Updated: May 16, 2016 23:44 IST