शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या उपमहापौरांसह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:33 IST

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केल्यावरून एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी सिटीचौक पोलिसांनी उपमहापौर विजय औताडे यांच्यासह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक केली.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : एमआयएम नगरसेवकाला केली होती मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केल्यावरून एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी सिटीचौक पोलिसांनी उपमहापौर विजय औताडे यांच्यासह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक केली.आरोपी नगरसेवकांमध्ये भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे आणि नगरसेविका माधुरी अदवंत यांचा समावेश आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर १७ आॅगस्ट रोजी सर्वसाधारण सभेत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन हे उभे राहिले आणि त्यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे चिडलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी मतीन यांना सभागृहात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी मतीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच नगरसेवकांविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.मतीनला अटक झाल्यानंतर भाजप नगरसेवकांना कधी अटक करणार, असा सवाल पोलिसांना विचारला जाऊ लागला होता. त्यामुळे सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे, उपनिरीक्षक सतीश पंडित आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी पाचही नगरसेवकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. औताडे यांना त्यांच्या वॉर्डातील संपर्क कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.‘त्या’ नगरसेवकांची जामिनावर सुटकानगरसेवक मतीन यांना मारहाण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास उपमहापौरांसह पाच नगरसेवकांना अटक करून ठाण्यात नेले. तेथे त्यांची तपासकामी चौकशी केल्यानंतर रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास जामिनावर सुटका केली. पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे म्हणाले की, हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना जामीन देण्यात आला.मतीन पोलीस कोठडीतउपमहापौर औताडे आणि बाळू खंदारे यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात नगरसेवक मतीन यांच्याविरोधात दोन समाजात द्वेष निर्माण करणे, चिथावणी देऊन जमावाला वाहनांची तोडफोड करण्यास लावल्याचा आरोप असलेले दोन वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे आणि दंगल करण्यासह अन्य कलमानुसार बेगमपुरा ठाण्यात मतीन आणि जावेद कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तोडफोडीच्या गुन्ह्यात मतीन हे सिटीचौक पोलिसांच्या कोठडीत आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनArrestअटक