शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खात्यावरून आधी केली हेटाळणी, आता सर्वच करतात निधीची मागणी : संदीपान भुमरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 19:23 IST

Sandipan Bhumare : आतापर्यंत या खात्याला कोणी विचार नव्हते; आता विविध योजना आणि निधीमुळे आले महत्व

खुलताबाद ( औरंगाबाद ) : खातेवाटपात रोहयो व फलोत्पादन मंत्रिपद मिळाल्याने, साधे खाते मिळाल्याची चर्चा अनेकजण करत होते. मात्र, कोरोना काळात सगळ्या मंत्र्याच्या खात्यांचा निधी कपात करण्यात आला, पण माझ्या खात्याचा झाला नाही. आज सर्वच मंत्री व आमदार माझ्याकडे निधीची मागणी करत आहेत, असा टोला रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी हेटाळणी करणाऱ्यांना लगावला. आतापर्यंत कुणी या खात्याला विचारत नव्हते, पंरतु अनेक नवीन योजना शेतकरी, मजूरासाठी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना आल्याने या खात्याचे महत्व वाढले आहे. आता या खात्याच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास साधणार असल्याची ग्वाही मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

खुलताबाद येथे मातोश्री ग्रामसमृध्दी योजनेची आढावा बैठक रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीस आ. प्रशांत बंब, आ. अंबादास दानवे, जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, जि. प. सदस्य सुरेश सोनवणे, भीमराव खंडागळे, तालुका प्रमुख राजू वरकड, सभापती गणेश आधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, मंदार वैद्य, सुदर्शन तुपे, जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर आदीसह सरपंच, ग्रामसेवक व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांनी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, रोहयो अंतर्गत असणा-या कामाचा प्रत्येक तालुकास्तरावर आढावा घेण्यात येणार असून सर्वच ठिकाणाहून रस्त्याच्या कामासाठी मागणी येत आहे. शेतीचे रस्ते पूर्ण झाले तर शेतीचा व गावाचा विकास होईल. ग्रामीण भागात रस्ते करायचे असतील तर रोहयो शिवाय पर्याय नाही. एक कि. मी. खडीकरण कामासाठी २४ लाख रूपये देण्यात येणार असून रोहयोची कामे करत असतांनी अधिकारी व कर्मचारी यांनी कुठलीही भीती बाळगू नये, रस्त्याच्या कामात अकुशल कामे व्यवस्थित करा त्यामुळे मजूराला काम व शेतीला रस्ता मिळेल. तालुक्यात किमान एक हजार किमीचे रस्ते व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच रोहयोच्या कामात खुलताबाद तालुका मागे असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पाणंद रस्त्याच्या कामासाठी गावातून जास्तीत जास्त कामे सादर करून रस्त्याची कामे करून घ्यावी, यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे ही मंत्री भुमरे स्पष्ट केले. 

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबाद