शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

जुलैच्या सुरुवातीला पहिल्यांदा जायकवाडीत ४० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:50 IST

सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग आला २०१९ च्या पावसाळ्यात 

ठळक मुद्देमागील पाच वर्षांमध्ये यंदा उत्तम स्थिती 

- विकास राऊत

औरंगाबाद : येथील उद्योग, व्यापार आणि सामान्यजणांची जीवनवाहिनी असलेल्या नाथसागरात (जायकवाडी धरण) यंदा मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच जुलैच्या सुरुवातीला ४० टक्के जिवंत जलसाठा आहे. 

गेल्या वर्षी खरीप आणि रबी हंमागाची सात आवर्तने देऊनही धरणात जिवंत साठ्याचे प्रमाण मोठे आहे. जायकवाडी धरणाला बांधून ४४ वर्षांचा काळ लोटला आहे. या काळात सर्वाधिक वेळा दरवाजांचे आॅपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग गेल्यावर्षी करण्यात आला. उन्हाळ्यात खरीप हंगामासाठी ४ आवर्तने (पाणी सोडणे) देण्यात आली. रबी हंगामासाठी ३ आवर्तने देण्यात आली. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. परभणी जिल्ह्यातील शाखा कालवा येथून २०८ कि.मी. अंतरावर असून, तिथपर्यंत धरणातून पाणी सोडण्यात आले. 

२०१६ साली धरण होते मृतसाठ्यात जायकवाडी धरणात २०१५ साली ५६ दलघमी पाणी होते. २०१६ साली धरण मृतसाठ्यात  गेले होते. २०१७ साली ४१९, तर २०१८ साली ४८९ दलघमी पाणी होते. २०१९ साली २१७१ दलघमी पाणी असल्याने धरण १०० टक्के भरले होते, तसेच अंदाजे १,०५० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. सध्या धरणात १,६११ दलघमीच्या आसपास पाणीसाठा आहे. गेल्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे ४६ दिवस खुले करण्यात आले. धरणाला एकूण २७ दरवाजे असून, १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे उघडलेले नव्हते. १० ते २७ क्रमांकांपर्यंतचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणांच्या ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड पहिल्यांदाच झाला आहे. आजवर ५ ते १० वेळा ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड आहे. १०० अधिक वेळा ‘गेट आॅपरेशन’ मागच्या पावसाळ्यात झाले

पाच वर्षांत पहिल्यांदाच झाला ४० टक्के पाऊसदेशभर कोरोनाच्या नियंत्रणासाठी यंत्रणा काम करीत असताना पावसाने मात्र यंदा सुखकारी आगमन केले आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच जून महिन्यात जिल्ह्यांत सुमारे ४० टक्के पाऊस बरसला. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यांतम १९ दिवस पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.  १ जूनपासून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १९ दिवस पाऊस झाल्याची नोंद आहे. परिणामी, ६५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये  ६७५.४४  मिलीमीटर पाऊस विभागात होणे अपेक्षित असून, ३० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७१.४५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

पाच वर्षांतील लघु व मध्यम         प्रकल्पांची स्थिती : जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९३ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ३९३ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. १६ मध्यम प्रकल्प मागील पाचपैकी तीन वर्षे २०१५ ते २०१८ पर्यंत मृतसाठ्यात होते. २०१९ साली या प्रकल्पांत ५० टक्क्यांपर्यंत पाणी आले. काही प्रकल्प भरले. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये २० टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पांत २०१५ ते २०१७ शून्य टक्के पाणी होते. २०१७ साली ४ टक्के, तर २०१८ साली ७ टक्के पाणी होते. २०१९ साली दीड टक्का, तर २०२० सालच्या जूनपर्यंत १३ टक्के पाणी लघु प्रकल्पांत आहे. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस