शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये प्रथमच ११४० विद्यार्थ्यांची नीट परीक्षा होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 18:11 IST

या वर्षापासून बीडमध्ये प्रथमच नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा होत असून शहरातील तीन केंद्रांवर ११४० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

बीड : या वर्षापासून बीडमध्ये प्रथमच नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा होत असून शहरातील तीन केंद्रांवर ११४० विद्यार्थीपरीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने तयारी पूर्ण झाली असून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याांना सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. साडेनऊ वाजेनंतर कोणत्याही सबबीखाली प्रवेश मिळणार नसल्याचे सूचित केले आहे. 

नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढती संख्या व इतरत्र ठिकाणी परीक्षा केंद्रांमुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आ. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बीड येथे परीक्षा केंद्र मंजूर करावे अशी मागणी पुढे आली होती. सहा हजार विद्यार्थ्यांची सोय व्हावी या दृष्टीने केंद्राची मागणी केली होती. त्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बीड येथे परीक्षा केंद्र मंजूर केले. त्यावेळी २००० विद्यार्थ्यांसाठी बीड केंद्र असेल असे जाहीर झाले होते. परंतू नोंदणी केलेल्या केवळ ११४० विद्यार्थ्यांनाच बीड येथे परीक्षा केंद्र मिळाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र पुणे व इतर ठिकाणी परीक्षा केंद्र मिळाले आहे. 

६ मे रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी बीडमध्ये चंपावती माध्यमिक विद्यालय, नगर रोड, कर्मवीर महिला अध्यापक महाविद्यालय, हनुमान मंदिर रोड शाहूनगर आणि गुरुकुल इंग्लिश स्कूल गुरुकुलनगर जालना रोड, बीड हे तीन परीक्षा केंद्र आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महावितरणला पत्राद्वारे सहकार्याची मागणी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रनिहाय ६ पोलीस कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचे समजते.

सुलभ तपासणीसाठी नियमावली 

नीट परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर सर्व सूचना नमूद केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर तपासणी सुलभ व्हावी म्हणून ड्रेस कोड निश्चित केला आहे. - परीक्षार्थ्यांना बूट, सॉक्स घालून येण्यास प्रतिबंध असून सॅन्डल किंंवा स्लीपर चप्पल घालून येण्याबाबत सूचित केले आहे.विशेषत: सॅन्डलला हिल नसावे. - वेबसाईटवर अपलोड केलेल्या फोटो कॉपी तसेच प्रवेशपत्र एवढेच विद्यार्थ्यांनी आणावेत असेही सुचविले आहे.- परीक्षा पारदर्शीपणे व सुरळीत व्हावी या उद्देशाने ही नियमावली तयार केली आहे. परीक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना याबाबत सर्व सूचना दिल्या आहेत. 

तीन ठिकाणी तपासणी६ मे रोजी सकाळी १० ते ०१ वाजेदरम्यान नीट परीक्षा होणार आहे. ७.३० ते ९.३० या वेळेत परीक्षांर्थींना केंद्रावर हजर रहायचे आहे. तीन टप्प्यात तपासणीनंतर त्यांना केंद्रात प्रवेश मिळणार आहे.

तीन केंद्रांवरील परीक्षार्थी गुरुकुल इंग्लिश स्कूल    ५४०चंपावती मा. विद्यालय    ३६०कर्मवीर महिला कॉलेज    २४०

मेटल डिटेक्टर, बॅटरीने तपासणी सर्व परीक्षार्थींची मेटल डिटेक्टरने तपासणीनंतर केंद्रात प्रवेश मिळणार आहे. परीक्षार्थी मुलींची स्वतंत्र तपासणी महिला करणार आहेत. वेळप्रसंगी परीक्षार्थीच्या कानांची बॅटरीच्या उजेडात तपासणी होईल.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीBeedबीडcollegeमहाविद्यालय