लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : या वर्षापासून अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी १९ हजार ३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० जुलै रोजी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, ११ ते १३ जुलैदरम्यान महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. तथापि, मध्यंतरी सलग तीन दिवस शासकीय सुट्या होत्या. याशिवाय सुरुवातीला काही दिवस सर्व्हर हँग होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना आॅनलाइन नोंदणीसाठी अडचणीचा सामना करावा लागला. या बाबींचा विचार करता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने २९ जूनपर्यंत आॅनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर केली होती. सुरुवातीला अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. आता अकरावीच्या प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आज शनिवारपासून महाविद्यालयांना ‘कोट्या’तील प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मुभा देण्यात आली. अकरावीसाठी महाविद्यालयांना ‘इन हाऊस कोटा’, अल्पसंख्याक कोटा, व्यवस्थापन कोटा आणि तांत्रिक कोट्यातून प्रवेश देता येतील. शिक्षण विभागाने इन हाऊस कोट्यासाठी प्रवेशाच्या २० टक्के जागा, अल्पसंख्याक कोट्यामध्ये संबंधित महाविद्यालय ज्या धार्मिक तसेच भाषिक अल्पसंख्याकांसाठी आहे, त्याच प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवेश देतील.
पहिली गुणवत्ता यादी १० जुलै रोजी
By admin | Updated: July 2, 2017 00:44 IST