शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे पहिले महापौर शांताराम काळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 18:40 IST

१७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले.

औरंगाबाद : शहराचे पहिले महापौर डॉ. शांताराम यशवंतराव काळे (७३) यांचे  शनिवारी पहाटे (दि. २१ ) अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्योतीनगर येथील रहिवासी डॉ. शांताराम काळे यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. याचवेळी त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले. १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाली. महापालिकेच्या ६० जागांसाठी पहिली निवडणूक १७ एप्रिल १९८८ रोजी घेण्यात आली. या निवडणुकीत क्रांतीचौक वॉर्डातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले होते. 

काँग्रेस, दलित पॅथर, मुस्लिम लीग आणि अपक्षांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे १७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले. उपमहापौर म्हणून तकी हसन खान विराजमान झाले होते. महापौरांचा वर्षभराचा कार्यकाळ असल्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी काम केले. ५ जुलै १९८९ रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. नगरसेवक म्हणून त्यांनी चार वर्षे अत्यंत चांगले काम केले होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने महापौर नंदकुमार घोडेले यांनी काळे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे आजी, माजी नगरसेवक, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारकीर्द-  १९८२ मध्ये औरंगाबाद महापालिकेची स्थापना- १७ एप्रिल १९८८ रोजी नगरसेवक म्हणून निवडून आले. - १७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून निवड. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूMayorमहापौर