शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मराठा विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:01 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली. त्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरजू मुला-मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली. त्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरजू मुला-मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने छावणी परिसरातील निजाम बंगला येथील ३२ क्वॉर्टर उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण व अन्य अधिकाऱ्यांनी त्या क्वॉर्टरची पाहणी केली आहे. इतर सुविधांसाठी निविदा काढल्या आहेत. १ सप्टेंबरपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू होईल, या दिशेने जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभागाची यंत्रणा काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मराठा समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृह असावे, अशी आरक्षणासह विविध मागण्यांपैकी एक असलेली मागणी मराठा क्रांती मोर्चाने प्रत्येक मोर्चामध्ये लावून धरली आहे. ९ आॅगस्टच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनातदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वसतिगृहाच्या मागणीचा उल्लेख करण्यात आला. समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह कोल्हापूर येथे सुरू झाले आहे. दुसरे वसतिगृह औरंगाबादेत सुरू होत आहे. हळूहळू राज्यभर वसतिगृह सुरू होतील, असा दावा सूत्रांनी केला.सूत्रांनी सांगितले, वसतिगृहाची जागा निश्चित केली आहे. निजाम बंगला परिसरात बांधकाम विभागाचे क्वॉर्टर आहेत. छावणी पोस्ट आॅफिसच्या बाजूला क्वॉर्टर आहेत. मागील काही वर्षांपासून ते क्वॉर्टर विभागाने कुणालाही राहण्यासाठी दिलेले नाहीत. त्यांची डागडुजी, रंगरंगोटी करण्यात आली आहे. ३२ क्वॉर्टर दुरुस्त केले असून, ते मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १५ तारखेपर्यंत जिल्हाधिकाºयांनी विविध स्वयंसेवी संस्थांकडून वसतिगृह व्यवस्थापनासाठी निविदा मागविल्या आहेत. ३० मुली आणि ७० मुलांची त्या वसतिगृहात आवास-निवासाची व्यवस्था करण्यात येईल.

टॅग्स :marathaमराठाStudentविद्यार्थी