शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

एसटीतील प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब

By admin | Updated: June 8, 2014 00:55 IST

रवींद्र भताने , चापोली सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस.टी. बस. ती सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़

रवींद्र भताने , चापोलीसर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस.टी. बस. ती सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़ मात्र महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या अनेक बसमधील प्रथमोपचार पेट्याच गायब झाल्या आहेत़ तसेच ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या आहेत. त्यामधील औषधे गायब आहेत़ जनसामान्यांसाठी गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे बस याप्रमाणे परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास अविरत सुरू आहे़ सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन एस.टी. बस़ प्रवासासाठी गावागावातील प्रवासी आजही एस. टी. बसवर अवलंबून आहेत़ मात्र महामंडळाच्या बसला आव्हान म्हणून खाजगी वाहनांची समांतर यंत्रणा उभी राहत असली तरीही महामंडळाच्या बससारखा आरामदायी प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांचा आजही तिकडेच ओढा आहे़ एस.टी.चा प्रवास सर्वात सुखकर त्यामुळे कितीही दूरवरचा प्रवास असेल तर प्रवासी एस.टी.ला पसंती देतात़ एस.टी. बसला जर अपघात झाला तर अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली आहे़ अपघात ठिकाणापासून दवाखाना दूर असला तरी तिथेच प्रथमोपचार केल्यावर प्रवाशाचा जीव वाचू शकतो़ मात्र एस.टी.मधील चालक, वाहक किंवा आगारातील कर्मचारी कुणीही लक्ष देत नसल्याचे प्रथमोपचार पेटीलाच प्राथमिक उपचाराची गरज आहे़ काही एस.टी. बसची पाहणी केली असता त्यापैकी बहुतांश बसमधील प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचे आढळून आले आहे़प्रथमोपचार पेट्या लवकरच बसवूनवीन मागणी केलेल्या प्रथमोपचार पेट्या उपलब्ध झाल्या आहेत़ त्या काही दिवसांत बसमध्ये बसविण्यात येतील व ज्या पेट्यांमध्ये औषधे नाहीत त्यात औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आगारप्रमुख एस़पी़ जाधव यांनी दिली़