शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकातील उपहार गृहाच्या चिमणीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 20:28 IST

रेल्वेस्थानकातील उपाहारगृहामधील धूर सोडणाऱ्या चिमणीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्दे अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंधरा मिनिटांत आग विझवली. 

औरंगाबाद : रेल्वेस्थानकातील उपाहारगृहामधील धूर सोडणाऱ्या चिमणीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंधरा मिनिटांत आग विझवली. 

रेल्वे स्थानकामध्ये उपाहार गृहात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी स्टोव्हचा वापर केला जातो. याच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी चिमणीद्वारे तो बाहेर सोडला जातो.  अनेक महिन्यांपासून चिमणी स्वच्छ झालेली नसल्याने खाद्यपदार्थ तळले जात असताना हवेत तेलाचे कण उडून ते चिमणीच्या डकमध्ये साचले जातात. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास या उपहार गृहात पुरी तळण्यात येत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडाला. यामुळे चिमणीच्या आतील भागात साचलेल्या तेलाच्या थराने पेट घेतला. 

यामुळे आगीचे लोळ बाहेर आले. घटनेची तीव्रता लक्षात घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने पंधरा मिनिटांत आग विझवली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नसल्याचे स्टेशन मास्तर लक्ष्मीकांत जखडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :fireआगAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनpassengerप्रवासी