शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी गोडाऊनला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 18:30 IST

चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी या कंपनीच्या एलईडी ठेवलेल्या गोडावूनला रविवारी दुपारी आग लागली.

 

औरंगाबाद: चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी या कंपनीच्या एलईडी ठेवलेल्या गोडाऊनला रविवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या चार बंबासह जवानांनी पाच तास केलेल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. या घटनेत सुमारे एक कोटी रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केला. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महापालिका हद्दीतील जुने पथदिवे काढून एलईडी दिवे बसविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम दिल्लीतील इलेक्ट्रॉन एनर्जी ही करीत आहे. या कंपनीने एक वर्षापूर्वी चिकलठाणा एमआयडीसीमधील चैतन्य जी यांच्या मालकीचे  गोडावून भाड्याने घेतले आहे.  या गोडावूनमध्ये एलईडीचा साठा करून ठेवण्यात आला आहे. शिवाय शहरातील पथदिव्याचे एलईडी बदलल्यानंतर जुने पथदिवे आणि पथदिव्याचे पॅनल काढून आणलेले आहेत. जुनी पथदिवे आणि पॅनलही तेथेच जमा करून ठेवण्यात आले. एलईडी चे नवीन पॅनल, फिटींगसाठी वापरले जाणारे पुठ्ठे, केबल बंडलसह, एलईडी बसविण्याचे काम करण्यासाठी वापरण्यात येणा-या आठ ते दहा मिनी टेम्पो, क्रेन गोडावूनच्या प्रवेशद्वाराच्या आत उभी करून ठेवण्यात आली होती.दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक गोडावूनमध्ये आग लागली. ही आग दिवसताच गोडावून व्यवस्थापक अक्षय गुगळे यांनी घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळविली. गोडावूनच्या मध्यभागी लागलेली आग पसरत प्रवेशद्वाराकडे आली आणि त्याचवेळी आलेल्या वा-यामुळे आग गोडावूनच्या इतर भागापर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या सिडको येथील जवानांनी बंबासह आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आग वाढतच असल्याचे पाहून  एमआयडीसी ,पदमपुरा आणि गरवारे, व्हिडिओकॉन येथील अग्निशमक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर आणखी तीन बंब आणि पाण्याचे टँकर दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तास केलेल्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.