शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

'पीटलाईनसाठी महिनाभरात जागा शोधा'; दानवेंकडून कराड, जलील यांच्यावर जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 16:37 IST

या बैठकीनंतर खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्यापासून मी रस्त्यावर पीटलाईनसाठी जागा शोधणार आहे.

औरंगाबाद : रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी बैठकीत डाॅ. भागवत कराड ( Bhagvat karad ) आणि खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaj jalil ) यांना पीटलाईनसाठी ( Railway Pit line ) महिनाभरात जागा शोधावी, जागा शोधण्याची जबाबदारी दोघांवर देत असल्याचे म्हटले. जनशताब्दी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेली तर तिचा दर्जा निघून जाईल, असे म्हणत दानवे यांनी या रेल्वेचा विस्तार होणार नसल्याचे संकेत दिले.

आता रस्त्यावर जागा शोधूया बैठकीनंतर खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्यापासून मी रस्त्यावर पीटलाईनसाठी जागा शोधणार आहे. मालधक्का अन्य ठिकाणी हलविल्यास पीटलाईनसाठी जागा शक्य आहे. रेल्वेची बैठक फक्त जेवणासाठी बोलावली जाते, मात्र आम्ही जेवायला गेलो नाही. शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रश्न सुटला नाही तर रेल रोको आंदोलन करू, असे खासदार जलील म्हणाले.

नांदेड हा स्वतंत्र विभाग करावादमरेकडून नांदेड विभागाला सापत्न वागणूक दिली जाते. त्यामुळे हा विभाग मध्य रेल्वेला जोडला जावा किंवा नांदेड हा स्वतंत्र विभाग करावा, अशी मागणी परभणीच्या खासदार फौजिया खान यांनी केली. मात्र, बैठकीच्या प्रारंभीच खासदार संजय जाधव यांनी ‘दमरे’चा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी पूर्ण होत नसल्याविषयी खेद व्यक्त केला. तेलंगणात २ हजार ५२७ किलोमीटर रेल्वे मार्गाचे, तर नांदेड विभागात केवळ ८२ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण झाले. तर केवळ ३५ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले असून, हे निंदनीय असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतraosaheb danveरावसाहेब दानवेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा