शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

...अखेर महिला वाहकांच्या अतिरिक्त प्रसूती रजेची होणार अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 14:19 IST

एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणताच एकच खळबळ उडाली. याविषयी तीव्र पडसाद उमटले होते.

औरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला कर्मचार्‍यांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आॅगस्टमध्ये केली. याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक शुक्रवारी (दि. २३ ) महामंडळाने काढले असून आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत 'लोकमत' ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता.

एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणताच एकच खळबळ उडाली. याविषयी तीव्र पडसाद उमटले. याविषयी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. अखेर एसटी महामंडळातील हजारो महिला कर्मचार्‍यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव काळातील सुरू असलेल्या फेर्‍यांचा आढावा घेण्यासाठी दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आॅगस्टमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात महिला कर्मचार्‍यांच्या प्रसूती रजेचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी महिला कर्मचार्‍यांना बाळाच्या संगोपनासाठी तीन महिने रजा देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला. 

सात महिन्यांनी निघाले परिपत्रकसध्या महिला कर्मचार्‍यांना २६ आठवडे प्रसूती रजा दिली जाते. बहुतांश महिला मुलाच्या जन्मानंतर संगोपनासाठी ही रजा घेतात. काही महिलांना प्रसूतीपूर्व विश्रांतीची आवश्यकता असते. यामुळे नियमित रजेबरोबर अतिरिक्त तीन महिन्यांची रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली होती. यानंतर तब्बल सात महिन्यांनी या नव्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहे. या नव्या निर्णयाच्या परिपत्रकाचे महिला वाहकांनी स्वागत केले असून या पुढे गरोदरपणातील त्रास कमी होईल अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 

सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी अंमलबजावणी व्हावीअतिरिक्त रजेची घोषणा होऊन आता त्याच्या अंमलबजावणीचे  परिपत्रक निघाले आहे याचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाच्या अंमलबजावणीने राज्यभरातील सर्व महिला वाहकांना फायदा होईल. यासोबतच आता या निर्णयाची अंमलबजावणी सर्वच महिला कर्मचाऱ्यांसाठी व्हावी असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे म्हणाल्या.

टॅग्स :state transportएसटीState Governmentराज्य सरकारWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिलाGovernmentसरकार