शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:18 IST

मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती.

 - संजय खाकरेपरळी (बीड): प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज-परळी एक्स्प्रेस रेल्वे गाडी १५ ऑगस्टपासून आणि परळी-मिरज एक्स्प्रेस १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज धावणाऱ्या या रेल्वेमुळे विशेषतः परळी व पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. 

परळी रेल्वे स्टेशनहून सध्या 15 रेल्वे गाड्या धावत आहेत. आता परळी -मिरज गाडीची त्यात भर पडणार आहे. मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ती तब्बल दोन वर्ष पाच महिन्यानंतर सुरू होत आहे. ही रेल्वे गाडी सर्वांसाठी सोयीची असल्याने परळी रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. परळी-मिरज ही रेल्वे गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. परळी -मिरज रेल्वे परळीहून पूर्ववत सुरू करावी याकरिता लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना, परळीचे चंदूलाल बियाणी, प्रा राम बांगड, सूर्यकांत ताटे, रामेश्वर महाराज कोकाटे व सत्यनारायण दुबे यांनी यांनी खा. प्रीतम मुंडे, पुणेचे खा. गिरीश बापट, रेल्वेचे अधिकारी उदय भगरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा केला होता

अशी धावेल रेल्वेरेल्वे क्रमांक 11412  ही 15 ऑगस्टपासून 21.00 वाजता मिरजहून सुटेल आणि 06.10 वाजता परळीला पोहोचेल आणि ट्रेन क्रमांक 11411 ही 16 ऑगस्टपासून परळीहून 07.25 वाजता सुटेल आणि 17.55 वाजता मिरजला पोहोचेल. तर परळीहून मिरजगाडी घाटनांदूर, पानगाव , जानवळ , वडवळ नागनाथ,   कारेपूर,  लातूर रोड, लातूर, ढोकी येडशी, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, धालगाव मार्गे मिरजला जाईल. दरम्यान, वडवळ नागनाथ, जानवल, कारेपूर, पानगाव आणि घाटनांदूर  स्टेशनवर गाडी थांबेल. या ट्रेनमध्ये 10 जनरल डबे असतील.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडtourismपर्यटन