शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गायब झालेला ‘हायवा’ सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:30 IST

वाळूज महानगर: वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकापाठोपाठ गायब झालेल्या दोन हायवा पैकी एक ‘हायवा’चा शोध लावण्यात वाळूज पोलिसांना यश आले आहे. या हायवा चोरीमुळे अडचणीत सापडलेल्या वाळूज पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून हायवा शोधून काढला आहे. वाळूज पोलिसांच्या या ‘चमकदार’ कामगिरीची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

दुसऱ्या हायवाचा शोध सुरुच : जळगाव जिल्ह्यातील कोंडापूर परिसरातून हायवा आणला

वाळूज परिसरात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून, विना परवाना वाळूची वाहतूक या भागात खुलेआमपणे सुरु आहे. या वाळूचोरीमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडत असल्यामुळे वाळूमाफियावर लगाम लावण्यासाठी महसुल विभागाने पावले उचचली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदार डॉ. अरुण जºहाड यांच्या पथकाने वाळूज परिसरातील अवैधरित्या सुरु असलेल्या वाळू पट्यावर छापे मारले होते.

या कारवाईत वाळू तस्करीत सहभागी असलेल्या जमीनमालक, वाळूमाफिया, हेरगिरी करणारे आदीसह २३ जणाविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. महसूल विभागाने ४ नोव्हेंबरला वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा (एम.एच.२०, ई.जी.६७१८) पकडून वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केला होता. यानंतर दुसºया दिवशी रात्री वाळूज पोलिस ठाण्यासमोरुन हा हायवा वाळूमाफियांनी पळविला. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश छावणीचे सहायक पोलिस आयुक्त डी.एन.मुंडे यांना दिले होते.गायब झालेल्या हायवा प्रकरणात सातारा परिसरातील एकाचा सहभाग असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सातारा परिसरातून गोविंद जयराम सोळस याला ताब्यात घेतले.

सोळस याने हायवा मालक दीपक वाघमोडे याच्या सांगण्यावरुन हायवा जळगाव जिल्ह्यात लपवून ठेवल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्तमुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आर.आर.पवार, फौजदार तुषार देवरे, पोकॉ.रवी बहुले, राजु वाघ आदींच्या पथकाने सोळस याला सोबत घेऊन गुरुवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील कोंडापूर येथून हायवा शोधून काढला. तो वाळूजमध्ये आणून लावण्यात आला आहे. हायवा चोरी प्रकरणात सोळस याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याची १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीज रवानगी करण्यात आली.

दुसरा हायवाचा शोध सुरुदरम्यान, शेंदूरवादा शिवारातून पोलीस पाटील जयराम दुबिले यांच्या ताब्यात असलेला हायवा (एम.एच.२०- सी.टी.९८८९) हा १३ नोव्हेंबरला वाळूमाफियांनी लांबविला होता. आता या हायवाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबाद