शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अखेर औरंगाबाद मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 15:56 IST

मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले होते त्यांचीही आता बदली करण्यात आली आहे. आज सकाळी औरंगाबाद येथील  वैधानिक विकास महामंडळात त्यांच्या बदली आदेश आले.

औरंगाबाद : मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले होते त्यांचीही आता बदली करण्यात आली आहे. आज सकाळी औरंगाबाद येथील  वैधानिक विकास महामंडळात त्यांच्या बदली आदेश आले. कचरा टाकण्यास विरोध करणार्‍या मिटमिट्यातील नागरिकांना झोडपून काढणार्‍या पोलिसी कारवाईचा फटका पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना याआधीच बसला आहे. गेल्या २९  दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर कचर्‍याचे ढीग साचले आहेत. यावर महापालिकेच्या पदाधिकारी आणि आयुक्तांना तोडगा काढता आलेला नाही. ही समस्या जेथून सुरु झाली त्या नारेगाव येथील डेपोत कचरा टाकण्यासाठी परिसरातील नागरिकांना महापालिकेला चार महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत महापालिकेचे आयुक्त, प्रशासन आणि पदाधिकार्‍यांनी कोणताही तोडगा काढला नाही. कचर्‍याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचे गांभीर्य महापालिकेला नव्हते. चार महिन्यांची मुदत संपताच नारेगावकरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज येण्याइतपत वकूब महापालिका आयुक्त आणि पदाधिकार्‍यांकडे नसल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर मिटमिटा प्रकरणाने कचरा प्रश्न आणखीच पेटला. कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना धाडले. त्यांनी पंचसूत्री जाहीर केली. मात्र, या पंचसूत्रीचीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यामुळे कचर्‍याच्या प्रश्नाआधी आणि नंतरही महापालिका गंभीर नसल्याचे दिसले.कचरा प्रश्न निर्माण करून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याबरोबरच मिटमिट्यातील नागरिकांवर पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ महापालिका प्रशासनानेच आणल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांवर बळाचा वापर करण्याचा निषेधार्थ होता. आणि त्याचे फळ पोलीस आयुक्त यादव यांना मिळाले. याच न्यायाने कचर्‍याच्या या प्रश्नातून महापालिकेचे आयुक्तसुद्धा सुट शकत नव्हते.

काय आहे मिटमिटा प्रकरण ७ मार्च रोजी मिटमिट्यामध्ये महापालिका आयुक्त मुगळीकर यांच्या आदेशाने कचर्‍याची वाहने निघाली. नागरिकांनी काचरा टाकण्यास विरोध केला. पोलीस आणि नागरिकांमध्ये दगडफेकीच्या घटना होऊन संघर्ष निर्माण झाला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांनाच बदडून काढले. याचे पडसाद विधिमंडळात उमटले. अधिवेशन चालू असताना लोकप्रतिनिधींनी मिटमिट्यातील अत्याचाराकडे लक्ष वेधले. यावर काल मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा विधानसभेत केली. यानंतर या प्राश्वभूमिवर आज मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद