शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

अखेर छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गे पुणे रस्त्याच्या डागडुजीसाठी ३५ कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:20 IST

६० कि.मी. अंतरात खड्डेच खड्डे : पाच तासांच्या प्रवासाला लागतात ९ तास

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर मार्गे पुणे या विद्यमान मार्गाचे नूतनीकरण वर्षापासून रखडले आहे. परिणामी, ५० टक्के मार्ग खड्डेमय असून दररोज सुमारे २० हजार वाहनांना खड्ड्यांतून मार्ग काढत जावे लागते आहे. दिवाळसणात या रस्त्यावरील वाहतुकीचा खाेळंबा सोशल मीडियातून चव्हाट्यावर आला. खड्ड्यांमुळे पाच तासांचा प्रवास नऊ तासांवर गेल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर नाशिक सा. बां. विभागाने ३५ कोटींतून रस्त्याच्या डागडुजीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. वडाळा ते अहिल्यानगर या सुमारे ५० ते ६० कि.मी. अंतरातील दुरूस्ती यातून होईल. पुढच्या महिन्यात काम सुरू होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी लोकमतला सांगितले.

हा मार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हस्तांतरित करण्यासह मागार्ला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये घेतला. एनएच-७५३ एफ क्रमांक दिला. पुणे-शिरूर-अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, असे ते काम आहे. पुणे ते शिरूर या ५३ कि.मी. मार्गाचे ७ हजार ५१५ कोटींतून सहा पदरीकरण व शिरूर-अहिल्यानगर बाह्यवळण रस्त्यामार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासह सुमारे ९ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. यात ३० टक्के म्हणजेच २२५४ कोटी संस्थात्मक कर्जाद्वारे तर ७० टक्के म्हणजेच ५२६० कोटी महामंडळ बँकांकडून कर्ज घेईल. अहिल्यानगर ते देवगडपर्यंतचा रस्ता ४१० कोटींतून होईल. त्यापुढील काम ६०० कोटींतून होईल. काम पूर्ण झाल्यावर टोलवसुली सुरू होईल.

रस्त्याचे त्रांगडेसध्या शिरूर ते नगर ते देवगडमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत टोल सुरू आहे. डिसेंबर २०२९ व जानेवारी २०३७ पर्यंत टोल वसुली संपल्यावर बांधकाम विभागाकडेच रस्ता राहील. नगर ते देवगड या अंतरातील रस्ता टोलवसुली संपल्याने हे अंतर महामंडळाकडे हस्तांतरित होईल. पुणे ते शिरूर या अंतरातील ७५१५ कोटींचे काम करण्यास ३० वर्षे टोल वसुलीसह बीओटीवर महामंडळ करील. काम पूर्ण झाल्यावर २००८ च्या धोरणानुसार टोलवसुली केली जाईल. पण डागडुजीबाबत एमएसआयडीसी सध्या काहीही बोलण्यास तयार नसल्याने बांधकाम विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे.

सध्या अवस्था कशी?वडाळा-घोडेगाव, पांढरीपूल, घाटमार्ग अहिल्यानगरपर्यंत रस्ता खड्ड्यांत आहे.रोज २० हजार वाहनांचा राबता आहे.रुंदीकरण २४ वर्षांपूर्वी झाले.डिसेंबर २०२९ व जानेवारी २०३७ पर्यंत टोल वसुली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Proposal for Pune Road Repairs via Chhatrapati Sambhajinagar Approved

Web Summary : The Chhatrapati Sambhajinagar-Pune road, riddled with potholes, awaits repairs. A ₹35 crore proposal for fixing the Wada-Ahilyanagar stretch has been submitted after traffic snarls during Diwali. Work is expected to begin next month, offering relief to thousands of daily commuters using this vital route.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरroad safetyरस्ते सुरक्षा