शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चालकास मारहाण करून फिल्मीस्टाईल पळविला सळईचा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 20:29 IST

औरंगाबाद : जालना येथून चार लाखांच्या लोखंडी सळई घेऊन चांदवडला (जि.नाशिक) जाणाऱ्या ट्रकसमोर फिल्मीस्टाईल कार आडवी लावून सात ते ...

ठळक मुद्देशेंद्रा शिवारातील घटना: सात ते आठ जणांची टोळी होती चारचाकी कारमध्ये

औरंगाबाद : जालना येथून चार लाखांच्या लोखंडी सळई घेऊन चांदवडला (जि.नाशिक) जाणाऱ्या ट्रकसमोर फिल्मीस्टाईल कार आडवी लावून सात ते आठ दरोडेखोरांनी चालकाचे अपहरण करून ट्रक पळविला. दोन्ही हात बांधलेल्या ट्रकचालकास बेदम मारहाण करून लासूर परिसरातील एका शेतात सोडून दरोडेखोर पसार झाले. जालना रोडवरील शेंद्रा शिवारात शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.जुबेर अहेमद रफिक अहेमद (४७,रा. मालेगाव, जि. नाशिक) असे ट्रकचालकाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, जुबेर अहेमद यांनी शुक्रवारी रात्री जालना येथून ट्रान्स्पोर्टमधून सुमारे चार लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळई चांदवड येथे घेऊन जात होते. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील शेंद्रा शिवारात ते असताना एक कार अचानक त्यांच्या ट्रकसमोर आडवी झाली. जुबेर यांनी ट्रक थांबविताच कारमधून उतरलेले ७ ते ८ जण ट्रकच्या दोन्ही बाजूने केबिनमध्ये चढले. त्यांनी जुबेर यांना बेदम मारहाण करून पैशाचे पाकीट आणि मोबाईल हिसकावला. मोबाईलमधील दोन्ही सीमकार्ड काढून परत केले आणि मोबाईल स्वत:कडे ठेवला. त्यातील काही जणांनी जुबेरचे दोन्ही हात बांधले आणि तोंडाला रूमाल बांधला. ड्रायव्हर सीटवरून बाजूला करून एका आरोपीने ट्रक तीन ते चार किलोमीटरपर्यंत चालवीत नेला. त्यानंतर आरोपींपैकी काही जण त्यांच्या कारमध्ये बसले आणि त्यांनी जुबेरलाही कारमध्ये बसविले. पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरील पेट्रोलपंपावर त्यांनी कारमध्ये इंधन भरले. त्यांनी पंपावरील कर्मचाºयांसोबतही वाद घातला. तेथून पुढे ८ ते १० किलोमीटर अंतर कापल्यानंतर आरोपींनी जुबेरला एका शेताजवळ कारमधून उतरविले आणि ते सुसाट निघून गेले. त्यानंतर सुमारे एक किलोमीटरपर्यंत पायी चालल्यानंतर जुबेर यांना एका शेतात लोक वाहनात टमाटे भरत असल्याचे दिसले. त्यांनी जुबेरचे हात सोडले आणि तोंडाला बांधलेला रूमाल काढला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच तेथे धाव घेऊन जुबेरला लासूर स्टेशन येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. चिकलठाणा ठाण्याच्या हद्दीतील घटना असल्याने त्याच्याकडून घटनास्थळाची माहिती घेतली. गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी