लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलातील फळझाडे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. राज्य शासनाने चार कोटी वृक्षलागवडीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गतच जिल्ह्यात यंदा लागवड करण्यात येत असलेल्या साडेआठ लाख वृक्षांपैकी एक लाख २० हजार फळझाडे लावण्यात येणार आहे.गतवर्षी जिल्ह्याला साडेचार लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. पैकी ८० हजारांवर फळझाडांची लागवड करण्यात आली होती. पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी फळवर्गीय झाडांची लागवड करणे गरजेचे यंदा हे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. वृक्षतोडीमुळे जंगलातील पाण्याच्या स्त्रोतांसह फळवर्गीय झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे जंगली डुकरे, हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात पिंकाचे नुकसान करतात. एक जुलै रोजी मोठ्या प्रमाणात फळवर्गीन झाडांची सुध्दा लागवड करण्यात येणार असल्याचे वन विभागाने नियोजन केले असल्याची माहिती आहे. यामध्ये बोर, चिंच, पालावर्गीय झाडे लावल्यावर भर देण्यात येत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन निकुंभ म्हणाले. शासनाच्या बहुतेक सर्वच विभागांना वृक्षलागवडीची सक्ती करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे जागा मिळेल तेथे लावण्याची गरज आहे.
फळझाडे लागवडीवर भर...!
By admin | Updated: June 24, 2017 23:44 IST