शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शासकीय मेडिकलमधील पदे ‘निर्धारित’ वेळेत भरा; हायकोर्टाचे एमपीएससी व शासनाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध संवर्गांतील रिक्त पदे ‘निर्धारित’ वेळेत भरण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध संवर्गांतील रिक्त पदे ‘निर्धारित’ वेळेत भरण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या ‘टीसीएसआयओएम’ या खासगी  एजन्सी, जिल्हा प्रशासन आणि शासनास सोमवारी  दिले. इतकेच नव्हे तर खंडपीठाने विविध पदांसाठीची स्पर्धा परीक्षा घेऊन निकाल घोषित करण्यासाठी प्रमाणपत्रांची पडताळणी करून नियुक्तीपत्र देण्याबाबतचे वेळापत्रकही ठरवून दिले.

खा. इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. पदोन्नतीने भरावयाच्या प्राध्यापकांच्या ४१ रिक्त पदांपैकी शिफारशी प्राप्त झालेली ३३ पदे ६० दिवसांत आणि उर्वरित ८ पदे ९० दिवसांत भरा.  सरळ सेवेने भरावयाची प्राध्यापकांची ७१ पदे, सहयोगी प्राध्यापकांची १४० पदे १८० दिवसांत आणि सहायक प्राध्यापकांची ७६५ पदे २४० दिवसांत भरा. वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्गाची ४२९ पदे १२० दिवसांत भरा. औषधनिर्माता गट ब संवर्गाची १२ पदे ६० दिवसांत भरा. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्थ संस्थांमधील गट क संवर्गातील ५१८० पैकी नियुक्ती दिलेली १०३४ पदे वगळता उर्वरित पदे जिल्हा प्रशासनामार्फत ९० दिवसांत भरण्याचे निर्देश दिले. मुख्य सरकारी वकिलांनी या आदेशाची प्रत राज्याच्या मुख्य सचिवांपुढे सादर करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

...अन्यथा कारवाई

उच्च न्यायालयाने वेळोवेळी केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने डॉ. आशिष भिवापूरकर यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशीचा अंतिम अहवाल १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सादर करावा, अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निर्देश न्यायालयाने संबंधित चौकशी अधिकारी तथा सचिव सुमंत भांगे यांना दिले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय