शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध - प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:25 IST

सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात.

ठळक मुद्देओबीसी हक्क परिषदेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसादपरिषदेत नऊ ठराव मंजूर 

औरंगाबाद :  सेवेकरी असलेला ओबीसी समाज सत्ताधारी बनला पाहिजे. आलुतेदार- बलुतेदार सत्तेत आला पाहिजे. लहानातल्या लहान ओबीसी समाजाच्या पदरात काही तरी पडले पाहिजे. सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात. म्हणून हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्धचा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ओबीसी हक्कपरिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते. २ आॅक्टोबरच्या जबिंदा लॉन्सवरील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत अर्जुन महाराज पांचाळ यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांना त्रास दिला, हा धागा पकडून ते बोलत होते.

यावेळी अर्जुन महाराज पांचाळ, हरिभाऊ भदे, सोपानराव डोईफोडे, प्रा. किशन चव्हाण, दादाराव पांचाळ, अंबादास रगडे, अमीन जामगावकर, टी.एस. चव्हाण, राम पेरकर, अ‍ॅड. महादेव आंधळे, ग.ह. राठोड, राजपालसिंग राठोड, प्रा. सुदाम चिंचाणे आदींची भाषणे झाली. अ‍ॅड. आंबेडकर यांच्या आधी अध्यक्षीय समारोपात  अ‍ॅड. शरदश्चंद्र वानखेडे यांनी नऊ ठराव वाचून दाखवले व ते मंजूर झाले. पंडित बोर्डे यांनी सूत्रसंचालन केले, तर विसपुते यांनी आभार मानले.यावेळी अ‍ॅड. बी.एच. गायकवाड यांनी वकिलांच्या एका शिष्टमंडळासह निवेदन सादर केले. अ‍ॅड. आंबेडकर यांचा सत्कार एका मोठ्या पुष्पहारात करण्यात आला. सभास्थानी ते येताच फटाक्यांची आतषबाजी केली. भारत खोगरे, प्रकाश विसपुते, दीपक राऊत, अब्दुल रऊफ, सुभाष वानखेडे, आजीनाथ जाधव, सुरेश चव्हाण आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. मंचावर अमित भुईगळ, प्रा. माणिक कांबळे, रविकांत राठोड, मनोज घोडके, निशांत पवार  आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीदेवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मंडल आयोगाने जो एसईबीसी उभा केला, तो गु्रप १ आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो एसईबीसी मराठा (कुणबी) उभा केला, तो ग्रुप २, असे वर्गीकरण करून मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर ते कदाचित न्यायालयात टिकले असते. मात्र, फडणवीसांनी तसे केले नाही. त्यांची नियत साफ दिसत नाही. ते फसवेगिरी करीत आहेत. मराठा आरक्षणामुळे आपले आरक्षण संपले, अशी भावना आता ओबीसींमध्ये निर्माण  झाली आहे. ओबीसी नेत्यांच्या म्हणण्यात मला तथ्य दिसत आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबाद