लोहारा : घराची आतील कडी उघडून अज्ञात चोरट्यांनी रोख १२ हजार व दोन मोबाईल असा एकूण १५ हजार रूपयाचा माल लंपास केल्याची घटना शहरातील शिवनगर भागात गुरूवारी मध्यरात्री घडली आहे. लोहारा शहरातील शिवनगर भागातील जलस्वराज प्रकल्पाच्या पाण्याच्या टाकीजवळ दादासाहेब बळीराम घोडके यांनी आपल्या प्लॉटवर पत्र्याचे शेड उभारून ते तेथे राहतात. गुरूवारी रात्री घरातील सर्व मंडळी झोपली असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराची आतील कडी पत्र्याच्या फटीतून हात घालून उघडत घरात प्रवेश मिळविला. यावेळी दादासाहेब यांच्या पॅन्टीच्या खिशातील ८ हजार ५०० रुपये व त्यांचे बंधू भाऊसाहेब यांच्या पॅन्टीच्या खिशातील ३ हजार ५०० रुपये तसेच दोघांचेही दोन मोबाईल असे एकूण १५ हजार रूपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात दादासाहेब घोडके यांनी दिलेल्या फियादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ.के.ए.सांगवे करीत आहे. (वार्ताहर)
पंधरा हजारांचा ऐवज लंपास
By admin | Updated: May 23, 2015 00:38 IST