शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

वाळूज एमआयडीसीमध्ये कोरोगेटेड बॉक्स तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:57 IST

fire at a company in Waluj MIDC लाखो रुपयांची हानी झाली असून मशनरीसह कच्चा-पक्का माल भस्मसात

ठळक मुद्देशॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज कंपनी बंद असल्याने जिवीत हानी टळली

वाळूज महानगर : कोरोगेटेड बॉक्स तयार करणाऱ्या वाळूज उद्योगनगरीतील व्ही.व्ही.इंडस्ट्रिज या कंपनीला मंगळवारी (दि.२२) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आग लागली. यात कंपनीतील महागड्या मशनरींसह कच्चा व पक्का माल भस्मसात झाला असून, कंपनी बंद असल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. (  fire at a company manufacturing corrugated boxes in Waluj MIDC) 

संजय शिवराम अहिरे (रा.विटखेडा) व संदीप डहाळे (रा.औरंगाबाद) यांची भागीदारीत वाळूज एमआयडीसीत व्ही.व्ही. इंडस्ट्रिज (प्लॉट क्रमांक के.१२९) आहे. या कंपनीत विविध प्रकाराचे कोरोगेटेड बॉक्स तयार करण्यात येतात. मंगळवारी दुपारी १.३० वाजता कंपनीतून अचानक धूर व आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे सुरक्षारक्षक नाथा चव्हाण यांना दिसले. यानंतर त्यांनी संजय अहिरे व संदीप डहाळे यांना कळविले. त्यांनी वाळूज अग्नीशमन विभागाला आगीची माहिती देत कंपनीकडे रवाना झाले. लगतच्या कंपन्यातील कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॉक्स व रॉ-मटेरियलने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान, वाळूज अग्नीशमन विभागाचे अधिकारी के.ए.डोंगरे, बी.जी.काळे, एस.एफ.वासनकर, एस.आर.गायकवाड, डी.एन.राठोड, ए.एम.हातवटे, आर.ए.चौधरे, सी.डी. साळवे, पी.ए.कोल्हे, ए.एस.अंभोरे, व्ही.एस.खेडकर आदींनी दोन अग्निशमन बंब व खाजगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

आगीत हे साहित्य भस्मसातआगीत कंपनीत कोरोगेटेशन मशिन, टेस्टिंग मशिन,, रोटरी मशनी, स्टिचींग मशिन, पंचींग मशिन, हाय मशिन आदी महागड्या मशनरीसह कंपनीतील कच्चा-पक्का माल, फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे आगीत भस्मसात झाल्याचे कंपनीमालक संजय अहिरे यांनी सांगितले.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबादfireआग