शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या वस्तीला डोंगराची भीती

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

परळी: बीड जिल्ह्यातील आजही अनेक तालुक्यातील छोटे-मोठी गावे, वाड्या, वस्त्या, डोंगरदरीत वसलेल्या आहेत. माळीणच्या दुर्दैवी घटनेनंतर डोंगरदऱ्यात वसलेल्या या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परळी: बीड जिल्ह्यातील आजही अनेक तालुक्यातील छोटे-मोठी गावे, वाड्या, वस्त्या, डोंगरदरीत वसलेल्या आहेत. माळीणच्या दुर्दैवी घटनेनंतर डोंगरदऱ्यात वसलेल्या या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात माळीणचीच पुनरावृत्ती आपलेकडेही होते की काय ? अशी भीती जाणवत असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. या लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणीही जोर धरत आहे. परळी शहरातील काही वस्त्या जवळपास डोंगराशेजारीच वसलेले आहे.शहरातील मेरू पर्वतासमोरील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मागील परिसरात अनधिकृतपणे डोंगरुन पोखरुन मुरुम काढला जात आहे. यामुळे डोंगराचे सपाटीकरण होत असून, त्यांचे सौंदर्यही गायब होत आहे. डोंगर पोखरल्यामुळे तो भुसभसीत झाला आहे. डोंगर भुसभसीत झाल्याने तो कधीही कोसळू शकतो? अशी भीती येथील रहिवाशांच्या मनात नेहमी असल्याचे दिसून येत आहे. मात्र माळीणच्या दुर्दैवी घटनेनंतर यामध्ये आणखीनच भर पडली आहे.डोंगर पोखरुन मुरुमाची विक्री केली जाते. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या संगनमतानेच झाला आहे. याप्रकाराची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. आजही डोंगरात ब्लास्टिंग करुन दगड, मुरुम काढले जात आहेत. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मागील अनेक दिवसांपासून डोंगराची ब्लास्टिंग करण्यास प्रशासनाचेच सहकार्य असल्याचा आरोप भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा, नरेश पिंपळे यांनी केला आहे.डोंगरालगत घरेयेथील ग्रामीण पोलीस ठाणेही डोंगरावरच आहे. त्याखाली बसवेश्वर कॉलनी आहे. या कॉलनीत राहणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे काही घरे तर डोंगरावरच वसलेली असून, पावसाळ्यात येथील रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडते. मेरू पर्वत निसर्गरम्य ठिकाण म्हणून तालुक्यात ओळखले जाते. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मेरूगिरी उद्यान व भक्त निवास इमारत उभारण्यात आली. त्यामुळे येथे भाविकांसह फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. एवढी वर्दळ असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महादेव ईटके, उमेश खाडे यांनी केला आहे. (वार्ताहर)पाहणी करुन कारवाई करू- चौधर हा डोंगर पोखरुन मुरुम, दगड विक्री केले जात असतील तर संबंधितांवर थेट कारवाईचा बडगा उगाराला जाईल, असे उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांनी सांगितले.या डोंगराची आम्ही पाहणी करुन त्यावर निर्णय घेऊआमचे अधिकारी, कर्मचारी या डोंगराची पाहणी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठवूपरिसरातील रहिवाशांनीही काळजी घेण्याची गरज असून, प्रशासनालाही सहकार्य करावेडोंगर पोखरणे थांबवावे.