ताडकळस : जावई मुलीस नांदवायला घेऊन जात नसल्यामुळे पित्याने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २९ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़ पालम तालुक्यातील आरखेड येथील शंकर हरिभाऊ पठाडे (वय ४०) यांची मुलगी प्रिया हिचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला होता़ जावई मुलीस सासरी नांदण्यास नेत नसल्यामुळे शंकर पठाडे यांनी गोळेगाव येथे जाऊन कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली़ त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ ताडकळस पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आरक़े़ नाचन, जमादार पवार हे करीत आहेत़ (वार्ताहर)
कीटकनाशक प्राशन करून पित्याची आत्महत्या
By admin | Updated: August 31, 2014 00:09 IST