शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वडिलांच्या कष्टाचं तिनं मोल केलं...

By admin | Updated: June 18, 2014 01:41 IST

हणमंत गायकवाड , लातूर तीन- चार एकर कोरडवाहू जमीन... निसर्गाने दिली साथ तर कधी पिकायचं... नाही तर पेरलेलं खर्चही वाया जायचा...

हणमंत गायकवाड , लातूरतीन- चार एकर कोरडवाहू जमीन... निसर्गाने दिली साथ तर कधी पिकायचं... नाही तर पेरलेलं खर्चही वाया जायचा... पोहरेगावच्या लक्ष्मण खाडप यांची ही स्थिती... अशा बिकट स्थितीत त्यांच्या पदरी तीन कन्या जन्माला आल्या. उपजतच प्रचंड बुद्धीमत्ता घेऊन जन्मलेल्या या बाळांना कसल्याही परिस्थितीत शिकवायचं, असा ध्यास खाडपांचा आणि त्यांनी थेट पोहरेगावच्या जि.प. शाळेतून मुलींना श्री केशवराज विद्यालयात घातलं. पहिल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत ८५ तर आता दुसऱ्या मुलीने आता ९६.२० टक्के गुण घेऊन लक्ष्मणरावांच्या बाहुत बळ दिलं आहे. रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील लक्ष्मण खाडप यांना तीन-चार एकर कोरडवाहू जमीन आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या या जमिनीच्या पिकावर अवलंबून न राहता त्यांनी गावातच ‘लोकमत’चे वार्ताहर म्हणूनही काही वर्ष काम केले. या वृत्तपत्रात काम केल्यामुळे शिक्षणाचे महत्व कळाले असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांनी पोहरेगाव सोडलं आणि थेट लातूर गाठलं. लातुरातील श्री केशवराज विद्यालयात दोन्हीही मुलींना शिक्षण दिलं. दोन नंबरच्या अंकिताचा दहावीचा निकाल मंगळवारी लागला. त्यात अंकिताला ९६.२० टक्के गुण मिळताच लक्ष्मणराव पुटपुटले, माझ्या कष्टाचं मोल झालं. पहिली मुलगी विज्ञान शाखेत आहे. अंकिताही विज्ञानलाच प्रवेश घेणार आहे. अंकिताला व्हायचंय् डॉक्टर...वडील आमच्यासाठी काबाड कष्ट करतात. मी पाचवीपर्यंत पोहरेगावच्या जिल्हा परिषद शाळेत होते. वडिलांनी शहरातील शाळेत घातलं. तिथे काहीच कमी पडू दिले नाही. त्यांचे कष्ट आम्ही पाहतो आहोत. हे कष्ट वाया जाऊ देणार नाही. मी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होणार आहे. दहावीला मला विज्ञान विषयात ९८ तर संस्कृतमध्ये १०० पैकी १०० मार्क्स मिळाले आहेत. मार्क्स घटू न देणे आणि डॉक्टर होणे हे आपले पुढील ध्येय असेल, असेही अंकिता खाडप म्हणाली.