शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बाप नंबरी, बेटा दस नंबरी! साॅफ्टवेअरने महागड्या कारचा कोड स्कॅन करून ३ मिनिटांत चोरी

By सुमित डोळे | Updated: January 15, 2024 20:03 IST

दोघांनी २०२० पासून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने चोऱ्या सुरू केल्या. कार चोरताच ते हरयाणा, हैदराबाद, पंजाबात एजंटला विकत

छत्रपती संभाजीनगर : लाखोंचे साॅफ्टवेअर विकत घेऊन महागड्या कारवर असलेला कोड स्कॅन करून क्षणात चोरी करणारे बाप-लेक शेख दाऊद शेख मंजूर (५८) व शेख अरबाज शेख दाऊद (१९, रा. घाटनांद्रा, बुलढाणा) हे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. आठ महिन्यांमध्ये त्यांनी शहरातून ९, तर अन्य तीन जिल्ह्यांतून ५ चारचाकी चोरल्या. त्या सर्व हरयाणा व पंजाबमध्ये विकल्याने त्या शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. मात्र, त्यांची कार चोरण्याची अद्ययावत यंत्रणा पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले. ‘बाप नंबरी, बेटा दस नंबरी’ सिनेमाप्रमाणेच ही गुन्हेगार बाप-लेकाची जोडी आहे.

९ डिसेंबर रोजी एन-४ मध्ये राहणाऱ्या दिनेश पाटील यांची घरासमोरून इनोव्हा कार चोरीला गेली होती. गुन्हे शाखा तपास करत असताना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाले होते. ते राज्यभरात वाहनचाेरीसाठी कुख्यात दाऊद असल्याचे दिसले. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार संजय नंद, योगेश नवसारे यांनी त्यांचा शोध सुरू केला. दोन सापळ्यांतून बाप-लेक निसटले. १२ जानेवारी रोजी ते नारेगावमध्ये येत असल्याची माहिती मिळताच वाघ, नंद यांनी परभत म्हस्के, विजय भानुसे, संजीवनी शिंदे, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह सापळा रचून त्यांना पकडले.

८ महिने, १४ कारदाऊद व त्याच्या ४ मुलांवर आतापर्यंत राज्यभरात वाहनचोरीचे ३० वर गुन्हे नोंद आहेत. दोघांनी २०२० पासून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने चोऱ्या सुरू केल्या. कार चोरताच ते हरयाणा, हैदराबाद, पंजाबात एजंटला विकतात. प्रामुख्याने नव्या क्रेटा, इनोव्हा गाड्याच ते चोरतात. ऑगस्ट २०२३ मध्ये जालना पोलिसांनी दाऊदच्या चारही मुलांना अटक केली होती.

अशी करतात चोरी-ऑनलाइन बाजारात, दिल्लीला १.५ ते ४ लाखांपर्यंत रिले बॉक्स किंवा ओबीडी डिव्हाइस विकत येते.-नव्या कारवर अनेकदा बारकोड चिटकवलेला असतो. तो या बॉक्सद्वारे स्कॅन केल्यास कारची सर्व इत्थंभूत माहिती येते.-लॅपटॉपवरून कार रिसिट करताच कार उघडते.-त्याशिवाय, स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा तोडून ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट करतात.-कॉर्डद्वारे डिव्हाइस कनेक्ट करून सेन्सर बंद करून कुठल्याही चावीने कार सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद