शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जमिनीच्या वादातून पित्याने केला पोटच्या मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:14 IST

जमीन नावावर करून देण्याची मागणी करणाऱ्या पोटच्या मुलाचा डोक्यात टिकासच्या दांड्याने वार करून खून करणाºया बापाविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सिल्लोड तालुक्यातील वरूड येथे ही घटना घडली. विजय कौतिक मिरगे (२६, रा. वरूड), असे मृताचे नाव असून, कौतिक रायभान मिरगे (५०) हा आरोपी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : जमीन नावावर करून देण्याची मागणी करणाऱ्या पोटच्या मुलाचा डोक्यात टिकासच्या दांड्याने वार करून खून करणाºया बापाविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सिल्लोड तालुक्यातील वरूड येथे ही घटना घडली. विजय कौतिक मिरगे (२६, रा. वरूड), असे मृताचे नाव असून, कौतिक रायभान मिरगे (५०) हा आरोपी आहे.आता मुलगा तर गेला, पतीविरुद्ध तक्रार दिली, तर तोही जेलमध्ये जाईल, या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने विजयच्या अंत्यविधीनंतर पतीविरुद्ध गुरुवारी तक्रार दिली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार संदीप सावले यांनी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.कौतिक मिरगे याच्याकडे ९ एकर शेती असून, त्यांना विजय व विनोद ही २ मुले आहेत. यातील विजय हा साडेतीन एकर शेती करीत होता. सर्व खर्च विजय करायचा; पण जमीन बापाच्या नावावर असल्याने कौतिक शेतात माल आला की, विकून टाकायचा. यावरून बाप-लेकात सतत वाद होत होते. १ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता बापाने शेतमाल विकल्याने रागात असलेल्या विजयने माझी शेती माझ्या नावावर करून द्या, अशी मागणी केली; पण बापाने रागाच्या भरात विकासच्या डोक्यात टिकासने वार केले. विजयची आई अनिता मिरगे हिने सोडविण्याचा प्रयत्न केला; पण तिला अपयश आले. तिने आरडाओरड केल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला शेजारील नागरिक व भाऊ विनोदने तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी विजयची प्राणज्योत मालवली. गुरुवारी या घटनेची बोंब झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली व नराधम बापाला अटक केली.आई... माझ्या मुलाचा सांभाळ कर!रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयजवळ आई होती. आपण वाचत नाही, हे विजयला समजले होते. अर्धवट शुद्धीत त्याने आईला ‘माझ्या मुलाला सांभाळ गं’ असे विव्हळत सांगितले. अंगाला शहारा आणणारे हे वक्तव्य ऐकून आईपण हादरली होती. हे दृश्य बघून तिने कठोर होऊन पतीविरुद्ध खून केल्याची तक्रार दिली.मयताची पत्नी प्रसूतिसाठी गेली होती माहेरीविजयच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत विजयच्या पश्चात पत्नीसह १ सहा वर्षांचा मुलगा आहे. त्याची पत्नी गर्भवती असून, ती प्रसूतिसाठी माहेरी गेलेली आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी