शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बाप-लेकास सश्रम कारावास व दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:19 IST

सुनेची छेड काढणाऱ्यावर शेख अय्युब शेख हिराजी आणि त्याचा मुलगा शेख आसिफ शेख अय्युब या दोघांनी तलवार आणि सुºयाने प्राणघातक हल्ला केला होता. त्या दोघांना सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी मंगळवारी (दि.१६ एप्रिल) ‘खुनाचा प्रयत्न केल्या’च्या आरोपाखाली प्रत्येकी ७ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : सुनेची छेड काढणाऱ्यावर शेख अय्युब शेख हिराजी आणि त्याचा मुलगा शेख आसिफ शेख अय्युब या दोघांनी तलवार आणि सुºयाने प्राणघातक हल्ला केला होता. त्या दोघांना सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी मंगळवारी (दि.१६ एप्रिल) ‘खुनाचा प्रयत्न केल्या’च्या आरोपाखाली प्रत्येकी ७ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.निहाल जमील अहमद शेख (२०, रा. देवळाई) याने शेख अय्युब शेख हिराजी (४२) याच्या सुनेची छेड काढल्याचा आरोप करीत शेख अय्युब याच्यासह शेख आसिफ शेख अय्युब (२१), शेख अमीन शेख चाँद (२५), शेख चाँद शेख मदोद्दीन (५०) व शेख समीर शेख अय्युब (२५, सर्व रा. देवळाई परिसर) यांनी १४ आॅगस्ट २०१६ रोजी दुपारी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात शेख अय्युब, शेख आसिफ आणि शेख समीर यांनी फिर्यादी निहालच्या पोटावर तसेच छातीवर तलवार व सुºयाने गंभीर वार केले. शेख अमीन व शेख चाँद यांनी निहालला पकडून मारहाण केली. निहालला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निहाल जमीलच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०७, १०९, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, ३२३ अन्वये चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील शरद बांगर यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने शेख अय्युब शेख हिराजी व शेख आसिफ शेख अय्युब यांना भादंवि कलम ३०७ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला, तर शेख अमीन व शेख चाँद यांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. सहआरोपी शेख समीर शेख अय्युब हा अद्यापही फरार आहे.चौकटफिर्यादी निहाल जमील अहमद शेख याने ‘एनसीसी’चे ‘बी’ व ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त केले होते. तो सैन्यात भरती होण्याची तयारी करीत होता. मात्र, गंभीर हल्ल्यामुळे त्याला दीड महिना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. परिणामी, त्याच्या भवितव्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन दंडातील १० हजार रुपयांपैकी ७ हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी