शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवरील जड वाहतूक बंद केल्याने घटले प्राणांतिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:29 IST

अपघाताना आळा घालण्यासाठी बीड बायपासवरील जड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत बंद करण्याचा पोलीस आयुक्तांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जड वाहनांमुळे बायपासवर होणारे अपघात अडीच महिन्याच्या कालावधीत घटल्याचे समोर आले.

ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांचे प्रयत्न : सकाळ आणि सायंकाळी जड वाहतूक बंद करण्याच्या प्रयोगाला यश

औरंगाबाद : अपघाताना आळा घालण्यासाठी बीड बायपासवरील जड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत बंद करण्याचा पोलीस आयुक्तांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जड वाहनांमुळे बायपासवर होणारे अपघात अडीच महिन्याच्या कालावधीत घटल्याचे समोर आले.दहा ते पंधरा वर्षांपासून सकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत जालना रस्त्यावर जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. तेव्हापासून जालना रस्त्यावरील जड वाहनांना बीड बायपास हा पर्यायी मार्ग देण्यात आला. त्यामुळे जालना रस्त्यावरील अपघातावर नियंत्रण आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बीड बायपासच्या पलीकडे नागरी वसाहतींची संख्या झपाट्याने वाढत आहे. तेव्हापासून बायपासवरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. बायपासवरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी २ सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर या रस्त्यावर जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत प्रवेशबंदी केली. हा निर्णय घेण्यापूर्वी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत बायपासवर विविध अपघातात १२ जणांचे बळी गेले होते. शिवाय ८ जण गंभीर आणि ५ जण किरकोळ जखमी झाले होते. तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत ९ जणांचे बळी गेले. १३ जण गंभीर आणि ३ जण किरकोळ जखमी झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बायपासवरील अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या वाढली होती. यामुळे पोलीस आयुक्तांनी बीड बायपासवरील जड वाहतूक बंद करण्याचा केलेला प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसते.चौकटआकडेवारीवर दृष्टिक्षेपगतवर्षी यावर्षीअपघातांतील बळींची संख्या -- ९ - १२गंभीर जखमी -- १३ - ०८किरकोळ जखमी -- ०३ - ०५---------------कोटजनहित पाहून बायपासवर जड वाहतूक नकोगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बायपासवरील अपघातांमधील बळींची संख्या वाढल्याचे दिसून येते. या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर जड वाहनांना सकाळ, सायंकाळ प्रवेशबंदी केली. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने बायपासवरील जड वाहनांसाठी दुसरा पर्यायी रस्ता तातडीने होणे आवश्यक आहे.- एच. एस. भापकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा------------------

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात