शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

आईच्या अश्रूंमुळे घेतले रुग्णसेवेचे व्रत

By admin | Updated: May 12, 2016 01:01 IST

औरंगाबाद : लहानपणाचा तो प्रसंग आजही आठवतो. आजारी पडल्यामुळे आईने मला रुग्णालयात नेले होते. मी आजारी असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले होते.

औरंगाबाद : लहानपणाचा तो प्रसंग आजही आठवतो. आजारी पडल्यामुळे आईने मला रुग्णालयात नेले होते. मी आजारी असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. या अश्रूंनी मला मात्र कधी स्वस्थ बसू दिले नाही. तेव्हाच रुग्णसेवेचे व्रत हाती घेण्याचे ठरविले. गेल्या ३२ वर्षांच्या कार्यकाळात रुग्णांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, याचीच काळजी घेतली आणि हाच माझ्या आईचा खरा सन्मान आहे, असे घाटीतील परिसेविका रजनी देहाडे भावनिक होऊन सांगत होत्या.जगभरात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १९ येथील परिसेविका रजनी देहाडे यांच्याशी संवाद साधण्यात आला. रजनी देहाडे यांनी या वॉर्डात अनेक छोट्या-छोट्या गोष्टीतून रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न केला. या वॉर्डात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासोबत आपुलकीचे नाते निर्माण होते. त्यामुळे येथून बरा होऊन जाणारा प्रत्येक रुग्ण डॉक्टरांबरोबर परिचारिकांची आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतो. रुग्णास चांगले वातावरण मिळावे, यासाठी रजनी देहाडे यांनी वॉर्डात अत्यावश्यक सोयी-सुविधा आणि स्वच्छतेवर भर दिला. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शिवाय आपले घर समजून काम करावे, यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. कर्मचाऱ्यांकडून त्यास प्रतिसादही मिळाला. उपचारासाठी येणारा रुग्ण आणि नातेवाईक आजारपणामुळे दु:खी असतात. त्यामुळे त्यांना समजून घेण्याची गरज असते. घाटीत ७७७ परिचारिकांवर३000 रुग्णांचा भार औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या घाटी रुग्णालयात ७७७ परिचारिकांवर दररोज तब्बल ३ हजार रुग्णसेवेचा भार आहे. ११५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढतो; परंतु कोणतीही तक्रार न करता परिचारिका रुग्णांची नि:स्वार्थपणे सेवा करीत आहेत.घाटी रुग्णालयात अहोरात्र सेवा करून रुग्णांना जीवनदान देणाऱ्या घाटीतील परिचारिकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. परिचारिका रुग्णसेवेबरोबर रुग्णांना येणाऱ्या अडचणी आणि संकटांवर मात करण्यासाठीही प्रोत्साहन देतात. रुग्णांना आरोग्य सेवा देताना कुठलीही हयगय होणार नाही, याची काळजी घेतात. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांबरोबर परिचारिकाही महत्त्वाची भूमिक ा पार पाडत आहेत. संख्याबळ कमी असतानाही तारेवरची कसरत करीत त्या सेवा देत आहेत. घाटी रुग्णालयात दररोज ३ हजार रुग्ण तपासले जातात. शेकडो रुग्णांची भरती होते; पण परिचारिका मनोभावे आपले कार्य करताना आढळतात. केरळहून शहराततरुणींचा ओढा वैद्यकीय, बँकिंग इ. क्षेत्रांकडे जाण्याचा असतो; परंतु आता नर्सिंग क्षेत्राकडेही त्यांचा कल वाढत आहे. राज्यात नर्सिंगचे शिक्षण चांगले असल्याने केरळहून अनेक विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये केरळी परिचारिकांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. आरोग्य क्षेत्राबाबत जनजागृती झाल्याने या क्षेत्रातही तरुणी पुढे येत आहेत.महत्त्वाची भूमिकाकुशल व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्य आणि वक्तशीरपणा या वैशिष्ट्यांसह परिचारिका रुग्णांना दिवस-रात्र सेवा देतात. त्यामुळे घाटीतील वैद्यकीय सांघिक कार्यात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची आहे.-डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटीजवानाने केला सलामया वॉर्डात हर्निया झालेल्या एका जवानावर नुकतेच उपचार झाले. देशाचा संरक्षण करणारा हा जवान होता; परंतु तरीही त्याने आमच्याकडून कोणत्याही सोयी-सुविधांची अपेक्षा व्यक्त केली नाही. परंतु तरीही आम्ही त्याच्याकडे अधिक लक्ष दिले. कारण तो देशाच्या सीमेवर आमचे रक्षण करतो. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी होती. चांगल्या उपचारामुळे जाताना त्याने आमच्या कार्याला सॅल्युट केल्याचे रजनी देहाडे यांनी सांगितले.