शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

सहाव्या दिवशीही उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:09 IST

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर गैरकारभाराचा आरोप असल्यामुळे त्यांची समितीमार्फत चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असेपर्यंत कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी १२ जूनपासून मराठवाडा विकास कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू आहे. सहाव्या दिवशीही उपोषण सुरू होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर गैरकारभाराचा आरोप असल्यामुळे त्यांची समितीमार्फत चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असेपर्यंत कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी १२ जूनपासून मराठवाडा विकास कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू आहे. सहाव्या दिवशीही उपोषण सुरू होते. या उपोषणाला राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) पक्षाचे युवा मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड आदींनी भेट देत पाठिंबा जाहीर केला.प्रा. दिगंबर गंगावणे, अ‍ॅड. मनोज सरीन, अ‍ॅड. शिरीष कांबळे, सुनील साबळे आदींनी विद्यापीठात उत्तरपत्रिकांचा घोटाळा, कुलगुरूंनी स्वत:च्या नावावर ४ कोटी रुपये वळती करणे, नियुक्त्यांच्या संदर्भातील अनियमितता आदींसह गैरव्यवहाराचा आरोप कुलगुरूंवर केला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी करीत प्रा. दिगंबर गंगावणे यांच्या नेतृत्वात (१२ जून) उपोषण सुरू आहे. शुक्रवारी रात्री अ‍ॅड. शिरीष कांबळे आणि सुनील साबळे यांची उपोषणामुळे प्रकृती खराब झाली. त्यांना त्वरित घाटीत हलवले आहे. त्यांच्याऐवजी आता अन्य दोघांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ, असे गंगावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. आ. सतीश चव्हाण यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला. तसेच राज्यपालांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रिपाइंचे नागराज गायकवाड, संघटक लक्ष्मण हिवराळे, नितीन वाकेकर, सतीश गायकवाड, राकेश पंडित आदींनी रविवारी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला.

टॅग्स :universityविद्यापीठagitationआंदोलन