शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

शेतकरी संपाची धग कायम

By admin | Updated: June 4, 2017 00:34 IST

जालना : शेतकरी संपाची धग तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचे चित्र शनिवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी संपाची धग तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचे चित्र शनिवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले. परतुरातील दोन्ही आठवडी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. जालना बाजार समितीमधील भाजीमार्केटमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीस आणला नाही. तालुक्यातील रामनगर येथे बैलगाडीसह रास्तारोको करण्यात आला.जालना बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकाळी भाजीपाला विक्रीस आणला नाही. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली.याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावरही जाणवला. भाजीबाजारात ऐरवी २५० रुपयांना विकणारे एक कॅरेट आज पाचेश रुपयाला विकले गेले. किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर वाढविल्याचे दिसून आले.परतूरमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत शेतकरी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. किसान क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी या बंदचे आवाहन करण्यात आले होते. परिणामी फळ, भाजीपाला व दुध विक्रे त्यांनी विक्री बंद ठेवत शनिवारी गाव व मोंढा भागातील बाजारात भाजीपाला, दूध विक्रीस आणले नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत गाव व मोंढा भागातील इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. परतूर मोंढा भागात सकाळी ७ वाजताच बाजार भरतो. परिसरातील खेड्यापाड्यांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस येतो. बाजारात दिवसभर प्रचंड गर्दी असते. मात्र, आज ही बाजाराची जागा खेळाचे मोकळे मैदान वाटत होते. एकही भाजीपाला व फळ विके्रता बाजाराकडे फिरकलाच नाही. परतूर गावालगत भरणाऱ्या बाजारात दुपारी तीन वाजेपर्यंत एकही विके्रता नव्हता. संप मागे घेण्यात आल्याच्या चर्चेमुळे दुपारी चारच्या सुमारास शहरातील खेड्यातील काही भाजीपाला विक्रते आले होते. मात्र, गाव भागातील बाजार एक तास भरला.या आठवडी बाजारासाठी खेडयापाडयातून येणारे ग्रामस्थ आज या बाजाराकडे फिरकलेच नाहीत. कडकडीत बंदमुळे शेतक ऱ्यांचा संप यशस्वी होण्याबरोबरच लाखोंची उलाढालही ठप्प झाली. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत जिल्हा हमाल मापाडी मजदूर युनियनने शनिवारी काम बंद ठेवून शेतकऱ्यांचा संपास पाठिंबा दिला. या संदर्भात युनियच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपास युनियचे पदाधिकारी, सदस्य व मजुरांचे समर्थन आहे. त्यामुळे मोंढ्यातील कामकाज सोमवारपर्यंत बंद राहील. शेतात मशागतीची कामे करणाऱ्या पुरुष व महिला शेतकऱ्यांना रोजगारी हमी योजनेतून किमान ५० दिवसाची मजुरी द्यावी, ५८ वर्षे झालेल्या शेतकऱ्यांना महिना पाच हजारांची पेंशन देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर हसनखाँ पठाण, लक्ष्मण करपे, अकबर सय्यद, हफिजखाँ नन्हेखान, ब्रम्हानंद जागडे, वैजिनाथ भारतीय, विलास केशरी, सुरेश गिरी, विलास हिवाळे, संतोष जगधने, राहुल करपे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.