शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

शेतकऱ्यांची मालमत्ता उघड्यावर

By admin | Updated: May 16, 2016 23:50 IST

उस्मानाबाद : बंद पडलेल्या ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कारखान्याची म्हणजेच शेतकरी सभासदांची कोट्यवधीची मालमत्ता पडून आहे.

तेरणा साखर कारखाना : पदभार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपउस्मानाबाद : बंद पडलेल्या ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कारखान्याची म्हणजेच शेतकरी सभासदांची कोट्यवधीची मालमत्ता पडून आहे. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हा उपनिबंधक तथा कारखान्याच्या प्रशासकांनी पदभार घेतलेला नाही. या प्रकाराबाबत ढोकी परिसरातील शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची मालमत्ता सहीसलामत ठेवण्यासाठी प्रशासकांनी तात्काळ पदभार स्वीकारावा, अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.थकित ऊस बिल अदा न करणे, संचालक मंडळाने गाळप क्षमतेचा पूर्ण वापर न करणे, गाळपास परवाना घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही न करणे यासह इतर कारणावरून तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या या निर्णयाविरुद्ध संचालकांनी अपिल दाखल केले होते. सुनावणी अंती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपिल नामंजूर करीत प्रादेशिक सहसंचालकांचा निर्णय कायम ठेवत, तेरणा कारखान्याच्या प्रशासकपदी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही बडे यांनी कारखान्याचा पदभार स्वीकारलेला नाही. एकेकाळी मराठवाड्यातील सर्वात मोठा साखर कारखाना अशी ओळख असलेली ही संस्था आज बंद पडल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखाना बंद पडल्याने तसेच मागील अनेक दिवसापासून कारखान्यामध्ये सुरक्षा कर्मचारी नसल्याने परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. विशेष म्हणजे कारखान्याचा वीजपुरवठाही सध्या बंद आहे. त्यामुळे उपनिबंधक बडे यांनी कारखान्याचा पदभार तातडीने स्वीकारावा, अशी मागणी सभासद शेतकऱ्यांतून होत आहे. याबाबत तेथील शेतकरी अब्दुलबारी काझी, बबनराव कावळे, झुंबर बोडके, सय्यद जावेद, विलास रसाळ, संजय घनगावे, राजीव रसाळ आदींनी जिल्हा उपनिबंधकांकडे तातडीने पदभार स्वीकारण्याची विनंती केली आहे. सद्यस्थितीत कारखान्याच्या शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सुरक्षा कर्मचारी नसल्याने कारखान्यातील अनेक मौल्यवान वस्तू उघड्यावर आहेत. सदर वस्तूंची चोरी झाल्यास शेतकरी सभासदांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी आणि राहिलेली मालमत्ता सहीसलामत ठेवण्यासाठी कारखान्याचा पदभार घ्या, अशी विनंती या शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक बडे यांच्याकडे चार दिवसापूर्वी केली आहे. मात्र त्यानंतरही कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.