शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, पिकावंरील कीड नियंत्रणासाठी शासनाकडून मिळवा मोफत औषधे

By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 16:26 IST

रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो.

छत्रपती संभाजीनगर : एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत पीक सरंक्षण औषधे, तणनाशके, जैविक खते आणि जैविक कीड नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित औषधे दिली जातात. बियाणे आणि रासायनिक औषधांचा यात समावेश आहे.

कशासाठी मिळते शासनाकडून अनुदानरब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी पिकासाठी शासनाची ही योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक आणि जैविक किटकनाशके शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहेत.

हरभरा बियाण्यासाठी हेक्टरी ५ हजार १०० रुपयेकृषी विभागातर्फे हरभरा बियाण्यासाठी शासनाने हेक्टरी ५ हजार १०० रुपये अनुदान दिले आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर त्यांना अनुदानित बियाणे दिले जाते.

मोफत तणनाशकेपिकाची पेरणी करताच शेतात तण उगवू नये, यासाठी तणनाशकाची फवारणी शेतात करावी लागते. तणनाशकासाठी शेतकऱ्याने महिनाभर आधीच अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरीमधून निवड झाल्यानंतर त्यांना या योजनेंतर्गत तणनाशक औषधांचा पुरवठा केला जातो.

मोफत जैविक कीड नियंत्रण औषधेपिकांचे सरंक्षण करताना जास्तीत जास्त जैविक औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत जैविक कीड नियंत्रण औषधांचा पुरवठा करण्यात येतो. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार निंबोळी अर्क, सूक्ष्म, जैविक संघ, (कॉसॉरशिया), फेरोमेन ट्रॅप्स, लुर्सहेलीकोव्हपी, स्टेम बोअरर, अझाडीरेकटीन १५०० पीपीएम, रासायनिक कीटकनाशक आदी प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात येतो.

कोणाला, किती मिळते अनुदान? (बॉक्स)हरभरा बियाणे - ५१०० रुपयेबीज प्रक्रिया - ११० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड १ - ९९० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ - ५१७ रुपयेएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकूण - १४३५ रुपये

रब्बी आणि खरीप हंगामासाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारकरब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. वर्षभर हे अर्ज स्वीकारले जातात. शिवाय प्राप्त अर्जांमधून खरीप आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद