लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने काढलेल्या आजच्या मोर्चाकडे जिल्ह्यातील शेतकºयांनीच पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसोबतच शहरातील पदाधिकारी मोर्चात सहभागी झाल्याने मोर्चाला बºयापैकी स्वरुप आले.शिवसेनेच्या वतीने सकाळी १० वाजता मोर्चा निघणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हा मोर्चा १२ वाजता निघाला. तेव्हा केवळ हजार ते दीड हजार लोक यात सहभागी होते. मोर्चा विभागीय आयुक्तालयावर जाणार असल्याचे माहीत असल्याने खेड्यापाड्यातून आलेले आणखी दोन हजारांहून अधिक लोक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातूनच मोर्चात सहभागी झाले. जिल्हास्तरीय मोर्चात ग्रामीण भागातून अत्यल्प लोक सहभागी झाले. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर निघालेल्या मोर्चाकडे जिल्ह्यातील शेतकºयांनीच पाठ फिरवल्याचे दिसले. औरंगाबाद शहरातील नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, शिवसेना जिल्हा, तालुका आणि शहरातील पदाधिकारी, महिला आघाडी मोर्चात सहभागी झाली होती.शिवसेनेचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. ठिकठिकाणी रस्ते बंद करावे लागतात, मोर्चेकºयांच्या वाहनांची व्यवस्थाही वेगळी करावी लागते. आजच्या मोर्चाच्या प्रसंगी मात्र असे कोणतेही चित्र पाहायला मिळाले नाही. औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी केवळ तासभर पोलिसांनी रस्ता बंद ठेवला होता.
शिवसेनेच्या मोर्चाकडे शेतकºयांनीच फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:58 IST