शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:12 IST

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सेनगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ फिटता फिटेना बुधवारी रात्री   तालुक्यातील  चिंचखेडा, आमदरी, लिंबाला, तांदलवाडी, बोडखा, येलदरी, सुकळी,खुडज ,पुसेगाव ,सेनगाव आदी भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यात काही ठिकाणी अक्षरशः गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या असमतोलपणामुळे मेटाकुटिला आला आहे. खरीप हंगामात काढणीचा वेळी अतिवृष्टी झाला ने सोयाबीन, तुर, कापूस आदी पिकांचे प्रचंड मोठे  नुकसान झाले असताना. रब्बी पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस ,गारानी झोडपून काढले आहे. मगळवारी रात्री तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.या पावसामुळे थोड्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले .परंतु बुधवारी रात्री तालुक्यातील सर्वच भागात जोरदार गारासह पाऊस झाला .तब्बल तासभर झालेल्या पावसाने शेतात उभे तसेच काढून ठेवलेल्या गहू,हरभरा आदी

पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काही तासांच्या गारपिटीमुळे तोंडचा घास तालुक्यातील रावून घेतला गेला आहे.गारपिटीमुळे चिंचखेडा,येलदरी,सुकळी खु,सुकळी बु या परिसरातील शेतात गाराचा खच झाला.उभा असलेला गहु,हरभरा जागेवरच आडवा झाला. त्या मुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, मागील चार पाच वर्षापासून या भागात गारपीट ही रब्बी हंगामात नित्याची होऊन बसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे,  खरीपातील  सोयाबीन अतिवृष्टी मुळे उध्वस्त झाले . आता गहू, हरभरा ज्वारी नगदी पिके हातची गेल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे .  फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे .या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस