शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मोठा दिलासा;किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणार पाच लाखांपर्यंत कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 11:40 IST

शेतीपूरक उद्योगातील मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतीपूरक उद्योगांसाठी मिळणार कर्ज १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना मिळणार कार्ड

औरंगाबाद : सावकरांकडून कर्ज घ्यावे लागू नये, यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. याद्वारे शेतीपूरक उद्योगातील मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे. कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. या अंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या जिल्हा मध्यवर्ती बँकें तर्गत १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान के्रडिट कार्ड देण्यात येणार आहे. 

प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डसंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांसाठी तसेच शेतीपूरक उद्योगालाही पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. यात १ ते ३ लाखांपर्यंतचे कर्ज हे दोन टक्के व्याजाने मिळणार असून, या उर्वरित २ लाखांच्या रकमेतून शेतीपूरक उद्योगातील कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय आदींसाठी कर्ज घेता येणार आहे. जिल्ह्यामध्ये पी. एम. किसान योजनेचे किती लाभार्थी क्रियाशील आहेत व ज्या खातेदार शेतकऱ्यांकडे अद्याप किसान क्रेडिट कार्ड बँकेकडून वितरित केलेले नाही, अशा शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेंतर्गतचे लाभ मिळण्यासाठीदेखील किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत ९१ हजार २६८ लाभार्थी असून, त्यातील  २८ हजार १० शेतकरी कार्डाचा लाभ घेत आहेत. उर्वरित ६३ हजार २५८ शेतकरी लाभार्थी नसून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जालना जिल्हा बँकेतील ५९ हजार २९ लाभार्भी शेतकऱ्यांपैकी २३ हजार ६१२ शेतकऱ्यांकडे कार्ड नाही. हिंगोली व परभणी येथे जिल्हा बँकेतील १ लाख ३८ हजार १९२ शेतकऱ्यांकडे कार्ड आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत जनजागृती मोहीम राबवून जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डद्वारे शेतकऱ्यांना वर्षभर बँकेतून जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा कर्ज काढता येणार आहे. यावेळी जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेटे, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेझ, कृषी सहसंचालक दत्तात्रय दिवटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर. आर. शिंदे यांची उपस्थिती होती. 

राष्ट्रीयीकृत, खाजगी बँका देतच नाही माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा मध्यवर्ती बँकेने किसान क्रेडिट कार्ड किती वितरित केले याची माहिती मागितली  होती. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका व खाजगी बँकांनी किती शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले याची माहिती अजूनपर्यंत पाठविली नाही. ४या बँका माहिती त्यांच्या मुख्यालयात पाठवितात. यामुळे विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे औरंगाबादसह जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांची सध्या तरी माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रbankबँकfundsनिधी